राजकीय खेळी पूर्ण, न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा : चिमणराव पाटील

Chimanrao patil
Chimanrao patilesakal

जळगाव : ‘राजकीय डावपेच संपले आहेत. आमच्या बाजूने बहुमत आहे. त्यामुळे आता केवळ न्यायालयाचा निकाल (Court decision) लागल्यानंतर आम्ही मुंबईत येऊ. आमचे सरकार स्थापन होईलच’, असा विश्‍वास शिवसेनेचे (Shiv sena) बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी ‘सकाळ- सरकारनामा’शी गुवाहाटी येथून बोलताना व्यक्त केला. (MLA Chimanrao Patil Statement about shivsena mla rebellion maharashtra political news)

शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर पाटील व चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, तसेच शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली असून, ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. सद्यःस्थितीत हे सर्व आमदार गुवाहाटी येथील रेडीसन ब्ल्यू या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत.

श्री. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, सध्याच्या राजकीय स्थितीबाबत ते म्हणाले, की आकड्यांचा राजकीय खेळ पूर्ण आटोपला आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमताचे संख्याबळ आहे. त्यामुळे आमचे सरकार स्थापन होईल. आमच्या १६ आमदारांना निलंबित करण्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. त्याच्या निकालाची प्रतीक्षा करणार आहोत. त्याचा निकाल लागला, की आम्ही मुंबईत येऊन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया करणार आहोत.

राजीनामा द्यावा लागणार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे संख्याबळ पूर्ण झाले असल्याचे सांगून आमदार चिमणराव पाटील म्हणाले, की आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्प मतात आले आहे. त्यामुळे सरकारला राजीनामा द्यावा लागणार आहे.

Chimanrao patil
जळगाव : बियाणे मार्केटमध्ये 120 कोटींची उलाढाल

मंत्रिपदाचा वाद मला माहिती नाही

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांच्या मंत्रिपदावरून वाद झाला का, याबाबत आमदार पाटील म्हणाले, की कसला वाद? मला माहिती नाही. माझा तर असा कोणताही वाद झाला नाही. इथे तसा कोणता वाद झाल्याचे मला माहिती नाही. सद्या या ठिकाणी एकदम चांगले वातावरण आहे. आपण पक्ष सोडून बंडखोरी का केली? यावर ते म्हणाले, त्याची अनेक कारणे आहेत. त्याबाबत निश्‍चित जाहीरपणे माहिती देईल.

Chimanrao patil
Jalgaon : पोलिस मुख्यालयासमोरच ATM फोडले; गुन्हा दाखल

मुख्यमंत्री प्रस्तावावर खुलासा नाही

बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव बंडखोर पन्नास आमदारांतर्फे देण्यात आल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रस्तावाबाबत मात्र काहीही सांगितले नाही. त्यांनी त्यावर फारसा खुलासाही केला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com