Jalgaon : पोलिस मुख्यालयासमोरच ATM फोडले; गुन्हा दाखल

ATM Machine at the spot
ATM Machine at the spotesakal

जळगाव : जिल्हा पोलिस दलाच्या जुन्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर स्वातंत्र्य चौकातील आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) एटीएमच्या स्क्रीनवर (ATM Screen) दगड मारून फोडल्याची घटना घडली. जिल्हापेठ पोलीसात याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. (ATM break by criminals before police headquarters Jalgaon Crime News)

ATM Machine at the spot
मुंबई-पुण्याच्या धर्तीवर अमळनेरला ‘प्रताप पॅटर्न’

शहरातील स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्समध्ये आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. त्याठिकाणी राहुल शंकर पाटील (वय २९, रा. बोदवड) हा सुरक्षा रक्षक ड्यूटीवर होता. शनिवारी (ता. २५) रात्री ११.५० वाजेच्या सुमारास कृष्णा अनिल महाजन (वय २६ रा. समतानगर, जळगाव) हा एटीएमजवळ आला. आणि रस्त्यावरील दगड उचलून एटीएम मशिनच्या स्क्रीनवर मारून पळाला. त्यावेळी राहुल पाटील याने हटकले असता कृष्णा महाजन याने त्यालाही मारहाण केली. याबाबत तत्काळ राहुल पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा महाजन याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

ATM Machine at the spot
जळगाव : बियाणे मार्केटमध्ये 120 कोटींची उलाढाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com