Jalgaon News : गिरणेवर पूल, 158 किमीचे शेतरस्ते मंजूर : आमदार किशोर पाटील

MLA Kishore Patil giving information about the development works in the constituency. Neighbors Ganesh Patil, Sunil Patil, Rajesh Patil etc.
MLA Kishore Patil giving information about the development works in the constituency. Neighbors Ganesh Patil, Sunil Patil, Rajesh Patil etc.esakal

Jalgaon News : पाचोरा- भडगाव मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेली असून, आणखी कामांना मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व युतीतील मंत्र्यांनी मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला.

मतदारांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. पाचोरा व भडगाव तालुक्यांत प्रथम १०० किलोमीटरचे व आता ५८ किलोमीटर लांबीचे शेतरस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील. (MLA Kishor Patil statement of Bridge over Girne 158 km from roads approved jalgaon news)

जळगाव चौफुली ते मालखेडा व कजगाव- गोंडगाव- कोळगाव- शिंदीपासून पारोळा हद्दीपर्यंतचा महामार्गासारखा रस्ता आणि गिरणा नदीवर पाचोरा व भडगाव तालुक्यांना जोडणारा भातखंडे येथील १५ कोटी रुपये खर्चाचा पूलही मंजूर झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावांतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, काँक्रिटीकरण अशी कामे मंजूर झाली असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात रविवारी (ता. १७) आमदार पाटील यांनी मंजूर विकासकामांसंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, की जळगाव चौफुलीपासून मालखेडापर्यंतच्या रस्त्यासाठी १४८ कोटी रुपयांचा निधी, तसेच कजगाव- गोंडगाव- कोळगाव- शिंदीमार्गे पारोळा हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी १४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे हे रस्ते येत्या काही महिन्यांत तयार होतील.

गिरणा नदीवर पाचोरा व भडगाव तालुक्यांना जोडणाऱ्या भातखंडे येथील पुलाच्या कामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येत्या महिनाभरात त्याचे टेंडर निघेल. गिरणेवर एकच पूल होता, आपल्या कारकीर्दीत आठ पूल झाले असून, फक्त बांबरूड महादेवाचे ते बांबरूड या गावांना जोडणारा एक पूल गिरणेवर प्रस्तावित केला असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल.

MLA Kishore Patil giving information about the development works in the constituency. Neighbors Ganesh Patil, Sunil Patil, Rajesh Patil etc.
Jalgaon News : मोफत एसटी पाससाठी विद्यार्थिनींची वणवण; पालकांत नाराजी

शेतकऱ्यांना शेतात येणे-जाणे, शेतमालाची वाहतूक सुलभ होणे यासाठी प्रथम १०० किलोमीटरचे रस्ते मातोश्री पाणंद योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. आता पुन्हा पाचोरा व भडगाव तालुक्यात ५८ किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.

१५८ किलोमीटर लांबीचे शेतरस्ते व निधी मंजूर झाला असला तरी एकही रस्ता अजून पूर्ण झालेला नाही. विविध कारणांमुळे शेतकरी यासाठी सकारात्मकता दर्शवत नसल्याने रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. या शेतरस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी, अभियंत्यांची बैठक घेऊन हे रस्ते पूर्णत्वास नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोहारी खुर्द, आंबेवडगाव, अंतुर्ली बुद्रुक, खडकदेवळा खुर्द, घुसर्डी, बांबरूड प्र.भ., मोंढाळे, मोहाडी, लासुरे, लोण पिराचे, लोहारी खुर्द, वडगाव खुर्द, वडगाव मुलाणे, वाडी, वाडे, वाणेगाव, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द, वडगाव खुर्द, नगरदेवळा, सांगवी, पिंप्री खुर्द, कोळगाव, जुवार्डी, बाळद बुद्रुक, भोजे, पिंप्री हाट, लोहारी बुद्रुक या गावांतील शेतरस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी किरकोळ वादविवाद, विरोध बाजूला ठेवून या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासंदर्भात सहकार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गावांतर्गत रस्त्यांसाठी ७७ कोटी मंजूर

पाचोरा व भडगाव तालुक्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० गावांच्या अंतर्गत विकासकामांसाठी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे स्पष्ट केले. यात सिमेंट रस्ता, रस्ते काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे अशा कामांचा समावेश असल्याने गावाबाहेरील रस्त्यांबरोबरच अनेक गावांच्या अंतर्गत स्त्यांचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याने दळणवळण सुविधेत वाढ होणार आहे.

पाचोरा- गिरड रस्त्यावरील काकणबर्डी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार असून, त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात पाच कोटींचे क्रीडा संकुल, सात कोटींचे सामाजिक वनीकरण विकासकामे व पाच कोटी काकणबर्डी सुशोभीकरणासाठी खर्च होतील. अधिवेशन संपताच कामांचा प्रारंभ करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

MLA Kishore Patil giving information about the development works in the constituency. Neighbors Ganesh Patil, Sunil Patil, Rajesh Patil etc.
Jalgaon News : ...तर परीक्षांसाठी इमारत, मनुष्यबळ मिळणार नाही; शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडवा : पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com