Latest Marathi News | Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FB-Hack

Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक !

जळगाव : चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक करत अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेतलेले धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले. एवढेच नव्हे, तर फेसबुक पेजला कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के यांचे लिंक असलेल्या क्रेडिटकार्डमधून ७० हजार रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाउंट हॅक केल्याबाबत, गोपाल शिवाजी म्हस्के (रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) यांनी याबाबत जळगाव सायबर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंट “Mangesh Chavan” व “Mangesh Chavan-मंगेश चव्हाण” हे फेसबुक पेज हॅक केले. (MLA Mangesh Chavan Facebook account hacked jalgaon)

हेही वाचा: Jalgaon : निसर्गटेकडी परिसरात वन्यप्राण्यांचा अधिवास

त्यानंतर प्रोफाइल छायाचित्र बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचे धमकी देणारे तसेच बदनामीकारक छायाचित्र अपलोड केले. फेसबुक अकाउंटवरील पोस्टदेखील डिलीट केल्या. एवढेच नव्हे, तर Mangesh Chavan-मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिटकार्डमधून ओटीपी न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Share Market : गुंतवणुकदार फक्त 40 हजारात बनले कोट्यधीश, मिळाला तगडा रिटर्न