Share Market : गुंतवणुकदार फक्त 40 हजारात बनले कोट्यधीश, मिळाला तगडा रिटर्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market : गुंतवणुकदार फक्त 40 हजारात बनले कोट्यधीश, मिळाला तगडा रिटर्न

Share Market : गुंतवणुकदार फक्त 40 हजारात बनले कोट्यधीश, मिळाला तगडा रिटर्न

Share Market : शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला संयम राखणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कारण शेअर बाजारात कायम अस्थिर वातावरण असते. अशात तुम्ही पैसे गुंतवले आणि अस्थिरतेमुळे काढले तर तुम्हाला म्हणावा तसा नफा मिळणार नाही, त्यासाठीच चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक आणि संयम महत्त्वाचा आहे.

हेही वाचा: Share Market : या फार्मा स्टॉकने 1 लाखाचे केले 4 कोटी, 23 वर्षात कोट्यावधी रिटर्न

अनेक कंपन्यांनी त्यांच्या लाँग टर्म गुंतवणुकदारांना भरघोस नफा दिला आहे, अशातच अपोलो ट्यूब्स लिमिटेड (APL) हा शेअर आहे. केवळ 40 हजारांच्या गुंतवणुकीवर या शेअर्सने 16 वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. कंपनीचे मार्केट कॅप 25,474.80 कोटी आहे. मागील महिन्यात, 16 ऑगस्ट 2022 रोजी त्याचे शेअर्स 1,146.25 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर होते.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

पण, त्यानंतर जागतिक परिस्थितीमुळे हा शेअर उच्चांकावरून 11 टक्क्यांनी खाली आला आहे. बीएसईवर अपोलो ट्युब्सचे शेअर्स बीएसईवर गुरुवारी 1017.85 रुपयांवर बंद झाले असले तरी ही गुंतवणुकीची योग्य संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा: Share Market: शेअर बाजारात तेजीनंतर घसरण, सेन्सेक्स 188 अंकांनी घसरला

कंपनीच्या शेअर्सची किंमत 2006 मध्ये फक्त 10 रुपये होती, ती आज 1017.85 रुपये झाली आहे. याचा अर्थ असा की, त्या वेळी म्हणजे अवघ्या 16 वर्षांपूर्वी फक्त 40 हजार रुपये गुंतवले असते तर ते आता 1.05 कोटी रुपये झाले असते. गेल्या केवळ पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात 5 पटीने वाढ झाली आहे.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

एपीएल अपोलो ट्यूब्स आधी बिहार ट्यूब म्हणून ओळखली जात होती. ही कंपनी स्ट्रक्चरल स्टील, माईल्ड स्टील वेल्डेड ब्लॅक ट्यूब्स, ब्लॅक स्टील ट्यूब्स, फेंस ट्यूब्स विकते. चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही तिच्यासाठी चांगली ठरली नाही. एप्रिल-जून 2022 मध्ये तिचा नेट प्रॉफिट तिमाही आधारावर 11.12 कोटी रुपयांवरून 5.94 कोटी रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, महसूलही 299.68 कोटी रुपयांवरून 240.70 कोटी रुपयांवर घसरला.

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 486 तर निफ्टी153 अंकांवर

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market