Jalgaon Amit Thackeray : मनसेचे अमित ठाकरे या तारखेला जिल्हा दौऱ्यावर

amit thackeray
amit thackerayesakal

Jalgaon Amit Thackeray : महासंपर्क अभियानांतर्गत नव्याने विद्यार्थी सेनेची बांधणी, नवीन विद्यार्थी प्रवेश, नवीन नियुक्ती व विद्यार्थ्यांशी संवाद, असा दौऱ्याचा प्रमुख हेतू आहे.

गुरुवारी श्री. ठाकरे धुळ्याहून जळगावला येणार आहेत. पारोळा, एरंडोल येथे त्यांचा सत्कार होईल. (MNS Amit Thackeray of on district tour jalgaon news)

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे गुरुवार (ता. २०)पासून दोनदिवसीय जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हा निरीक्षक विनय भोईटे यांनी दिली.

सकाळी अकराला त्यांचे जळगाव शहरात आगमन होईल. जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, विनोद शिंदे, आशिष सपकाळे, राजेंद्र निकम आदींतर्फे त्यांचे स्वागत होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

amit thackeray
MNS Raj Thackeray : 'सध्याचं वातावरण बघता मी कुणाशी युती करेन असं वाटत नाही'; राज ठाकरेंचं विधान

दुपारी १२ ते तीनपर्यंत हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीशी ते संवाद साधतील.

दुपारी चारला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंची सदिच्छा भेट, सायकांळी पाचला जैन इरिगेशनमधील कृषी तंत्रज्ञान प्रकल्पाला भेट, शुक्रवारी (ता. २१) ते भुसावळला प्रयाण करतील.

सकाळी दहाला नाहटा चौफुलीवर त्यांचे स्वागत होईल. लोणारी मंगल कार्यालयात विद्यार्थी सेना महासंपर्क बैठक, दुपारी तीनला जामनेरमार्गे ते छत्रपती संभाजीनगर येथे रवाना होतील.

amit thackeray
Amit Thackeray: "आपण लवकरच सत्तेत असू"; अमित ठाकरेंनी मनसेच्या कामगार मेळाव्यात व्यक्त केला विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com