Jalgaon Agriculture News : बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाही याची दक्षता घ्या : मोहन वाघ

Mohan Wagh, Joint Director of Agriculture while guiding in pre-kharif planning workshop.
Mohan Wagh, Joint Director of Agriculture while guiding in pre-kharif planning workshop. esakal

Jalgaon News : गुलाबी बोंडअळीचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूसलागवड १ जूननंतर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.

कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांपर्यंत बोगस खते, बियाणे व कीटकनाशके पोचणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी मंगळवारी (ता. २५) येथे दिल्या. (Mohan Wagh advised to take care that bogus seeds do not reach farmers jalgaon news)

खरीप व रब्बी हंगाम २०२२-२३ व खरीप हंगाम २०२३ ची पूर्व नियोजन आढावा सभा जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी श्री. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, की खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक वेळा परराज्यातील काही कंपन्या शेतकऱ्यांच्या बाधांपर्यंत बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री करण्याचा प्रयत्न करतात. अशा बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते, याकडे लक्ष देऊन खबरदारी घ्यावी. असे प्रकार आढळल्यास गुन्हे दाखल करावे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर (अमळनेर), उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड (पाचोरा), मोहीम अधिकारी विजय पवार (जि. प.), जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, जिल्हा डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शैलेंद्र काबरा, प्रमुख खत कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, जळगाव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, असोसिएशनचे पदाधिकारी व प्रमुख खत वितरक उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Mohan Wagh, Joint Director of Agriculture while guiding in pre-kharif planning workshop.
Jalgaon News : ‘एमआयएम’ नगरसेवकांना नोटीस; पक्षविरोधी केले काम

२०२२-२३ खरीप हंगाम व रब्बी हंगामातील बियाणे, रासायनिक खते मागणी व पुरवठ्याबाबत सादरीकरण करण्यात आले. खरीप हंगाम २०२२ मध्ये जिल्ह्यात एकूण सात लाख ४१ हजार ७१६ हेक्टर क्षेत्रावर (९६.२२ टक्के) पेरणी करण्यात आली होती. या पेरणीकरिता एकूण मागणीप्रमाणे ३९ हजार ६७३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते.

खरीप हंगाम २०२३ करिता सात लाख ५६ हजार ६०० हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित असून, त्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांमार्फत ३८ हजार ८८१ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामबीजोत्पादन अंतर्गत १७ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकरीस्तरावर उपलब्ध आहे. खरीप हंगाम २०२२ मध्ये मागणीप्रमाणे दोन लाख ६८ हजार ५५० टन खत पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला होता.

खरीप हंगाम २०२३ साठी तीन लाख पाच हजार १४० टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून, जिल्ह्यात एक लाख ५७ हजार ९२ टन खत साठा उपलब्ध आहे.

Mohan Wagh, Joint Director of Agriculture while guiding in pre-kharif planning workshop.
Uddhav Thackeray : चित्रकृती पाहून उद्धव ठाकरे भारावले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com