Jalgaon News : ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्यामुळे पैसे परत

Jalgaon: Neha Jagtap thanking Mahesh Chawla, Manisha Patil for getting the money back
Jalgaon: Neha Jagtap thanking Mahesh Chawla, Manisha Patil for getting the money backesakal

जळगाव : ग्राहक पंचायतीच्या पाठपुराव्यामुळे एका ऑनलाईन खासगी क्लासेसकडून अडीच महिन्यांत कष्टाचे पैसे ग्राहकाला परत मिळाले. संतोष जगताप यांनी मुलगी जानवी हिचे एका ऑनलाईन खासगी क्लासेसमध्ये ॲडमिशन करून घेतले. ५४ हजार फीमधून ऑनलाइन पाच हजार ॲडव्हान्स पेमेंट दिले.

तुम्हाला १५ दिवसांत क्लास नाही आवडला, तर तुमचे पैसे परत मिळतील, असे आश्वासनही त्या व्यक्तीने जगताप यांना दिले. दरम्यान, क्लासमध्ये काही समजत नसल्यामुळे जानवी हिने आठ दिवसांत मिळालेली किट कुरियरने कंपनीकडे परत केली. (Money back due to customer panchayat follow up jalgaon news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच...

Jalgaon: Neha Jagtap thanking Mahesh Chawla, Manisha Patil for getting the money back
Nashik News : पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी Smart तयारी; पण दगड उपलब्ध नाही

ॲडव्हान्स दिलेली रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार तक्रार केली. मात्र, कंपनीकडून अडीच महिन्यांत कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे श्री. जगताप यांनी मनीषा पाटील यांच्यासोबत येऊन ग्राहक पंचायतीच्या जळगाव तालुकाध्यक्ष महेश चावला यांच्याकडे हक्काचे पैसे परत मिळविण्यासाठी लेखी तक्रार दिली.

श्री. चावला यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला फोन करून विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र श्री. चावला यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचा सदस्य असल्याचे सांगून पैसे परत करण्यास सांगितले. त्यावरून ऑनलाईन खासगी क्लासेसवाल्यांनी १० मिनिटात जगताप यांच्या खात्यात पाच हजार रुपये परत केले.

Jalgaon: Neha Jagtap thanking Mahesh Chawla, Manisha Patil for getting the money back
Nashik News : पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी Smart तयारी; पण दगड उपलब्ध नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com