Jalgaon Crime News : झोपलेल्या रिक्षाचालकाचे पैसे-मोबाईल हिसकवला; आर्जव करूनही मारहाण

money mobile of sleeping rickshaw driver was stolen by thief Jalgaon Crime News
money mobile of sleeping rickshaw driver was stolen by thief Jalgaon Crime Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ झोपलेल्या रिक्षाचालकाच्या खिशातून रोकड, मोबाईल भामट्यांनी रात्री लुटून नेला. पैसे काढताना जाग आलेल्या रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली. (money mobile of sleeping rickshaw driver was stolen by thief Jalgaon Crime News)

जुनी जोशी कॉलनीतील रिक्षाचालक नीलेश ऊर्फ रायबा शांताराम जोशी (वय ३०) रविवारी (ता. १६) रात्री पुष्पलता बेंडाळ चौकात रिक्षा उभी करून मार्केटच्या पायरीवर झोपून गेले. तेथे तीन भामटे आले. त्यांनी रायबा जोशी यांच्या खिश्यातून सातशे रुपये रोख व मोबाईल काढून घेतला. जाग आल्यानंतर त्यांनी चोरट्यांकडे पैसे व मोबाईल मागितला.

मात्र, तिघांनी रिक्षाचालकास बेदम मारहाण केली. रिक्षाचालकाने चोरट्यांपैकी एकाला पकडून मदतीला आरोळ्या मारल्यावर रिक्षाचालकाचे परिचीत नाना काका, हिरामण भाऊ, चेतन यांच्यासह परिसरातील रहिवासी धावून आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

money mobile of sleeping rickshaw driver was stolen by thief Jalgaon Crime News
Jalgaon Crime: चाळीसगावी गुप्तधन काढणाऱ्या मांत्रिकासह 9 जण ताब्यात; नाशिक जिल्ह्यातील 5 जणांचा समावेश

पकडलेल्या भामट्याला बेदम चेाप दिल्यावर त्याची चौकशी केली असता, अंकुश मधुकर सुरवाडे (वय २५, रा. गेंदालाल मिल), अशी ओळख दिल्यावर जमावाने त्यास शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या साथीदाराची भुऱ्या (रा. भारतनगर) व शमीर (गेंदालाल मिल) यांची नावे पोलिसांना अंकुशने सांगितली.

तिघांना अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल, उपनिरीक्षक प्रिया दातीर, सहाय्यक फौजदार परीश जाधव, गिरीश पाटील, राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. रिक्षाचालकाची तक्रार घेत असतानाच पोलिस पथकाने संशयितांची ओळख पटवून अंकुश मधुकर सुरवाडे, अकील शेख असगर, मयूर पाटील यांना अटक केली.

money mobile of sleeping rickshaw driver was stolen by thief Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : जळगावात दिवसा गोळीबाराचा थरार! गुटख्याच्या पुडीवरून ठिणगी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com