Jalgaon : 2 मुलांच्या आईने अखेर मृत्युला कवटाळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dead Sunita Patil

Jalgaon : 2 मुलांच्या आईने अखेर मृत्युला कवटाळले

जळगाव : शहरातील सत्यम पार्क येथील तीस वर्षीय विवाहीतेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या (Suicide) केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. कौटुंबिक त्रासाला कंटाळत तिने मृत्युला कवटाळल्याचे सांगण्यात आले. तालुका पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Mother of 2 children finally embraced death Commits suicide Jalgaon News)

सुनिता शरद पाटील (वय-३० रा. पिंपळकोठा ता. एरंडोल, ह.मु. सत्यम पार्क, जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता पाटील व तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात गेल्या १० वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरु आहेत. दोघांचा संसार सुरळीत व्हावा यासाठी अनेक वेळा मनोमिलनाचा प्रयत्न केला. परंतु, शरद पाटील हा सुनिताला मारहाण करत असल्याने त्या विभक्त झाल्या होत्या. खोटेनगरातील सत्यम पार्क येथे लहान मुलगा आयुषसोबत त्या राहत होत्या. तर, पती शरद पाटील हा त्याचे आई- वडील आणि मोठा मुलगा वेदांत सोबत पिंपळकोठा येथे वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पाटील याने संतापाच्या भरात सत्यम पार्क येथे येवून घरातील संसारोपयोगी वस्तूंना आग लावून दिली होती. यात विवाहितेच्या बहुतांश वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

आई डबा घेऊन आली अन्‌...

सुनीता शुक्रवारी (ता.१३) रात्री घरी एकट्याच होत्या.. तर, मुलगा आयुष हा आजी-आजोबांकडे गेला होता. जवळच त्रिभुवन कॉलनीत सुनीताच्या आई- वडिलांचे घर असून लहान मुलगा आयुष तेथे असताना मध्यरात्रीच्या सुमारास सुनीताने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. दिवस उजाडल्यावर आज शनिवारी (ता.१४) सकाळी १० वाजता सुनीताच्या आई बेबीबाई भाईदास पाटील ह्या मुलीसाठी जेवणाचा डबा घेऊन तिच्या घरी आल्या होत्या. दार उघडत नसल्याने त्यांनी डोकावुन बघितल्यावर सुनीता गळफास घेतलेल्या अवस्थेत बघताच त्यांनी आक्रोश केला.

हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

माझ्या लेकीचा खुनच..

पतीच्या इतक्या जाचानंतर, सततच्या त्रासाला सहन करुन ती, वास्तव्यास होती. दोनच दिवसांपूर्वी त्याने घरातील साहित्य जाळून टाकले. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा पती शरद पाटील यानेच तिला गळफास देवून खून केल्याचा आरोप मत विवाहितेची आई बेबीबाई पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा: 40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम

पोलिसांत गुन्हा...

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, गणेश सायकर, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळनोर, संजय भालेराव अशांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. तालूका पेालिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Mother Of 2 Children Finally Embraced Death Commits Suicide Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top