40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी तीन महिन्याचा अल्टिमेटम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recovery of property tax

40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : नाशिक शहरात अनेक व्यावसायिक संकुलासह मिळकतीचा करच मिळत नाही. त्यामुळे कर वसुलीसाठी आयुक्तांनी तीन महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर म्हणजे साधारण १५ ऑगस्टपासून कर न भरणाऱ्या मिळकती आढळणाऱ्या भागातील निरीक्षकांना थेट सेवेतून बडतर्फीचा इशारा दिला आहे. (40 thousand properties without property tax 3 month ultimatum for tax recovery Nashik News)

महापालिका (NMC) हद्दीतील व्यावसायिक, तसेच निवासी अशा अनेक मिळकतीची कर वसूल होत नसल्याचा मुद्दा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. मात्र चर्चा आरोप- प्रत्यारोप पलीकडे त्यात प्रगती होत नाही. मात्र, आयुक्तांनी हा विषय अतिशय गंभीरपणे घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत सगळ्या मिळकतींना कर लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन महिन्यात ज्या विभागात विनाकर मिळकती असतील त्या भागातील निरीक्षकांवर थेट सेवेतून बडतर्फी करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

पंधरा वर्ष मेहेरबानी

कर हा महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी हा महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, महापालिका यंत्रणेकडून कायम हलगर्जी झाल्याचे पुढे आले आहे. कर भरत नसल्याच्या मिळकतीत केवळ घरच नव्हे तर व्यावसायिक संकुल आणि आस्थापनांच्या इमारती आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हॉटेलसह व्यावसायिक इमारतींना कर लावण्याची तसदीही घेतली गेली नाही. एका प्रकरणात तर थेट २००७ पासून कर आकारला गेली नसल्याचे पुढे आल्याने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेत ३ महिन्याचा अल्टिमेटम दिला. त्यानंतरही काम करणार नसाल तर, थेट सेवेतून बडतर्फ केले जाणार आहे. कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे दर १५ दिवसांनी बैठका घेऊन नियमित आढावा घेणार आहेत. तीन महिन्यात अशा कर असलेल्या मिळकतीचा शोध घेतला जाणार आहे.

हेही वाचा: वेळीच मदत मिळाल्याने महिलेला जीवदान मिळाले

Web Title: 40 Thousand Properties Without Property Tax 3 Month Ultimatum For Tax Recovery Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top