Latest Marathi News | जळगाव : मोटारसायकलींची समोरासमोर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bike accident

जळगाव : मोटारसायकलींची समोरासमोर धडक

जळगाव : ममुराबाद बसस्टॅण्डजवळ दोन मोटारसायकलींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली. जखमीने दिलेल्या तक्रारीवरून अपघाताला कारणीभूत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लोणी (ता. चोपडा) येथील रहिवासी अविनाश चंद्रभान पाटील (वय २८) हा तरुण त्याच्या (एमएच १९ डीएल ३०७५) या वाहनाने जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीवरील (एमएच १९ सीडी १९१६) चालक राहुल दिनकर वानखेडे (रा. चुंचाळे, ता. यावल) हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन सुसाट वेगात वाहन चालवत अविनाश याच्यावर धडकला. याबाबत तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक बापू कोळी तपास करत आहेत.

टॅग्स :BikesJalgaonaccident