MP Unmesh Patil : देशभरातील सक्रिय सदस्यांच्या यादीत खासदार उन्मेश पाटील ‘टॉप 10’मध्ये

MP Unmesh Patil
MP Unmesh Patilesakal
Updated on

MP Unmesh Patil : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा खासदार उन्मेश पाटील यांनी संसदीय कार्यात लक्षणीय कामगिरी बजावली असून, देशभरातील सक्रिय सदस्यांच्या 'टॉप- १०’ यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (MP Unmesh Patil in Top 10 list of active members across country jalgaon news)

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या माहितीनुसार विद्यमान आणि लोकसभेतील कामकाजामध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांनी लक्षणीय सहभाग घेतला. अशा लोकसभेत तब्बल २७० खासदारांमध्ये उन्मेश पाटील यांनी लक्षवेधी कामगिरी नोंदवत दहावा क्रमांक पटकावला आहे.

या लोकसभेत एकूण २७० खासदार आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या संसद सदस्यांनी गेल्या चार वर्षांत नेमकी काय कामगिरी बजावली याबाबतची विस्तृत माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केलेल्या डेटाबेसमधून समोर आली आहे.

सध्याच्या लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या २७० सदस्यांपैकी मंत्रिपद मिळालेल्या तसेच अल्प सहभाग घेतलेल्या सदस्यांना वगळून २५० सदस्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता मनोरंजक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MP Unmesh Patil
Jalgaon News : ट्रकमध्ये कोंबून 33 गुरांची वाहतूक; श्वास गुदमरल्याने 13 जनावरांचा मृत्यू

यात सदस्यांनी गेल्या चार वर्षात तब्बल ४१ हजार १०४ प्रश्न विचारले असून ६८५ खासगी विधेयके सादर केली आहेत. यासोबत या सदस्यांनी अंडर हाऊस रूल ३७७ च्या अंतर्गत १९०८ महत्वाचे मुद्दे लोकसभेत उपस्थित केले आहेत.

या तिन्ही म्हणजेच प्रश्न विधेयके आणि चर्चामधील सहभाग निकषांच्या बाबतीत काही खासदार हे आघाडीवर दिसून आले आहेत. या यादीमध्ये खासदार उन्मेश पाटील यांचा टॉप टेन खासदारांमध्ये समावेश झाला आहे. पीआरएस इंडिया या ख्यातप्राप्त संस्थेने जारी केली आहे. यात आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पहिल्या दहापैकी निम्मे म्हणजे पाच सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत.

कामाची धडाडी

जळगावचे युवा खासदार उन्मेश पाटील यांनी लोकसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची छाप आधीच उमटवली असताना सर्वाधिक सक्रिय असणाया टॉप १० सदस्यांमध्ये त्यांचा झालेला समावेश हा लक्षणीय मानला जात आहे.

त्यांनी गेल्या चार वर्षांत ४६० वेळेस संसदीय कार्यात सहभाग घेतला आहे. यात वर नमूद केल्यानुसार तिन्ही बाबींचा समावेश आहे. अशी नेत्रदीपक कामगिरी बजावल्याने खासदार उन्मेश पाटील यांच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

MP Unmesh Patil
Central Railway : तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम युद्धपातळीवर; मनमाड-भुसावळ विभागातील गाड्यांचा प्रवास होणार सुखकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.