
Central Railway : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ - मनमाड या तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम युद्धपातळीवर सुरू असून, १३६०.१६ कोटी रुपये खर्चून १८३.९४ किलोमीटर अंतराचे काम प्रगतिपथावर आहे.
उर्वरित कामे लवकरच होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (work of Bhusawal Manmad third railway line in Bhusawal section of Central Railway is in progress jalgaon news)
रेल्वेस्थानक आणि परिसराच्या विकासासह प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुकर व्हावा, या दृष्टीने विविध विकासकामे सध्या भुसावळ विभागात सुरू आहेत. तसेच मनमाड - दौंड दुहेरी मार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
भुसावळ विभागातील मनमाड - भुसावळ अंतर्गत असलेल्या नांदगाव ते मनमाड हे २५.०९ किलोमीटरचे काम यावर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. भुसावळ ते पाचोरा ७१.७२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
भुसावळ ते पाचोरा या विभागाचे काम देखील पूर्ण झाले असून, चाळीसगाव ते पिंपरखेड ३१.१९ किलोमीटर आणि नांदगाव ते मनमाड २५.९ किलोमीटरचे काम आता सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने कामाचे नियोजन केले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सध्या पाचोरा ते चाळीसगाव ४४.९४ किलोमीटर आणि पिंपरखेड ते नांदगाव १०.४० किलोमीटरचे काम सुरू आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षात भुसावळ ते मनमाड तिसऱ्या लोहमार्गाच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण होण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. यामुळे प्रामुख्याने उत्तर भारतातून आणि राज्याच्या विविध भागातून भुसावळ - मनमाड मार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांचा प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे.
या मार्गावरील रेल्वे गाड्यांची संख्या जास्त असून, हा मार्ग अहोरात्र व्यस्त असतो. परिणामी, भुसावळ - मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई- हावडा या व्यस्त मार्गावरील मनमाड-भुसावळ विभागातील रेल्वे गाड्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत होईल. शिवाय, प्रवासी गाड्यांबरोबरच मालवाहतूक गाड्यादेखील मोठ्या प्रमाणावर या मार्गाने धावतील. त्यामुळे रेल्वेला मोठा महसूल यातून मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.