esakal | ‘मलनिस्सारण’प्रकल्प उभारणीस विलंब; मनपावर खाते ‘सील’ची नामुष्की 

बोलून बातमी शोधा

Municipal_Corporation}

केंद्र व राज्य सरकारचे कठोर निकष व निर्देश असताना महापालिकेने त्यात विलंब केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा प्रकल्पांवर ‘मॉनिटरिंग’ करत असते.

‘मलनिस्सारण’प्रकल्प उभारणीस विलंब; मनपावर खाते ‘सील’ची नामुष्की 
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : आधीच विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या जळगाव महापालिकेवर मलनिस्सारण प्रकल्पाच्या उभारणीत केलेल्या विलंबामुळे ‘एस्क्रो’ अकाउंट सील होण्याची नामुष्की ओढवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पवित्र्यात त्यासंबंधी त्रुटी दूर करण्याचे हमीपत्र देत ही कारवाई दंडावर निभावली असली तरी कठोर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. 

आवर्जून वाचा- सावखेडा, आव्हाणे, मोहाडी, कुसुंबा महापालिका हद्दीत 
 

जळगाव महापालिकेच्या अजब कारभाराच्या अनेक गजब कथा आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, प्रकल्पाचे काम दिल्यानंतर त्यात थोडी प्रगती करत पळून गेलेला मक्तेदार, कामात निर्माण झालेले विवाद अशा अनेक प्रकरणांनी हा प्रकल्प गाजल्यानंतर मलनिस्सारण प्रकल्पाच्या उभारणीतही मनपाने उदासीनता दाखवली. आता भुयारी गटार योजनेंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पाची उभारणी दोन वर्षांपासून सुरू आहे. 

खाते ‘सील’ची कारवाई 
सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प खरेतर वर्षभरापूर्वीच तयार व्हायला हवा होता. केंद्र व राज्य सरकारचे कठोर निकष व निर्देश असताना महापालिकेने त्यात विलंब केला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा प्रकल्पांवर ‘मॉनिटरिंग’ करत असते. त्यामुळे प्रकल्पास उशीर होत असल्याने मनपास याबाबत मंडळाने वारंवार नोटीस बजावली. मात्र, तरीही पूर्तता न झाल्याने अखेर मनपाचे ‘एस्क्रो’ खाते सील करण्याची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली. 

दंडावर निभावले 
दरम्यान, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मनपाने याबाबत संबंधित प्रकल्प उभारणीतील अडचणींचा अहवाल सादर करत जुलै २०२१अखेर प्रकल्प पूर्ण करण्याबाबत हमीपत्र सादर केले. त्यामुळे मनपाच्या खात्याचे सील काढून केवळ दंडात्मक कारवाईवर निभावले. 

आवश्य वाचा- बाईक ट्रीपवर जाण्याच्या प्लॅन केलायं; या महत्वाच्या गोष्टी लक्षात असू द्या !
 

मलनिस्सारण प्रकल्पांच्या संदर्भात केंद्र सरकारचे कठोर निर्देश आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेस कितीही अडचणी असल्या तरी हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. ते झाले नाही म्हणून मनपावर कारवाई केली. 
-सोमनाथ कुरमुडे, 
उपविभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ 

मलनिस्सारण प्रकल्पाच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने खाते सील करण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्या वेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 
-कपिल पवार, 
मुख्य लेखाधिकारी, मनपा  

 

संपादन- भूषण श्रीखंडे