Jalgaon Budget 2023 : महापालिकेचे अंदाजपत्रक मंगळवारी सादर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

municipal budget will be presented on 21 march jalgaon news

Jalgaon Budget 2023 : महापालिकेचे अंदाजपत्रक मंगळवारी सादर होणार

जळगाव : महापालिकेचे २०२३-२४ चे अंदाजपत्रक (Budget) मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या विशेष महासभेत सादर करण्यात येणार आहे. (municipal budget will be presented on 21 march jalgaon news)

सतरा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सकाळी अकराला विशेष महासभा होणार आहे. महापौर जयश्री सुनील महाजन पीठासीन अध्यक्ष असतील.

महापालिकेत स्थायी समिती सभा अस्तित्वात नसल्याने महापौर जयश्री महाजन महासभेत अंदाजपत्रक सादर करतील.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ९५ अन्वये जळगाव २०२२-२०२३ चे सुधारित व २०२३- २०२४ च्या मुळ अंदाजपत्रकासाठी जमा व खर्चाच्या अंदाजाचे विवरण सादर होणार आहे.