जळगाव : प्लॅस्टिक बंदीवर आयुक्त ‘ॲक्शन मोड’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Commissioner seizes six tonnes of plastics

जळगाव : प्लॅस्टिक बंदीवर आयुक्त ‘ॲक्शन मोड’ वर

जळगाव : प्लॅस्टिक बंदीवर महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शुक्रवारी थेट ‘ॲक्शन मोड’ वर काम केले. किरकोळ विक्रेत्यासह थेट कारखान्यावर छापे टाकून तब्बल सहा टन प्लॅस्टिक जप्त केले, तर ५५ हजार रुपये दंड वसूल केला.

शासनाने प्लॅस्टिक बंदी केली आहे. मात्र, अद्यापही त्यावर कडक कारवाई केली जात नाही. प्लॅस्टिकचा सर्रास वापर होत आहे, तसेच त्याची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महापालिका क्षेत्रात त्यावर बंदी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कडक पाऊले उचलली. त्यांनी स्वत: मोहिमेत सहभाग घेत कारवाई केली. आरोग्य विभागाचे उपायुक्त अभिजित बाविस्कर, महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे संजय ठाकूर, आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक यु. आर. इंगळे, फायर विभागाचे शशिकांत बारी आदींची एकूण पाच पथके तयार करून अचानक कारवाई सुरू केली.

यात फुले मार्केट, बळीराम पेठ, दाणा बाजार, सुभाष चौक आदी ठिकाणी एकाच वेळी विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक जप्तीची व दंडात्मक कारवाई करण्यात केली. त्यानंतर औद्यौगिक वसाहतीतील प्लॅस्टिकनिर्मिती करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. या संपूर्ण कारवाईत एकूण सहा टन प्लॅस्टिक जमा करून ५५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. या वेळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

प्लॅस्टिक बंदी अधिनियमाचे उल्लंघन करणारे निर्माते, वितरक व किरकोळ विक्री करणारे विक्रेत्यांवर महापालिकेचची कारवाई निरंतर सुरू राहील. त्यामुळे आता कोणीही प्लॅस्टिककचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरातील सर्व नागरिक व व्यावसायिकांनी प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

-डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका

Web Title: Municipal Commissioner Seizes Six Tonnes Of Plastics 55000 Fine Recovered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top