Latest Marathi News | कर्मचारी भरतीचा आकृतिबंध लवकरच मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon Municipal Corporation : कर्मचारी भरतीचा आकृतिबंध लवकरच मंजूर

जळगाव : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित आकृतिबंध तसेच लेखापरीक्षण अहवाला लवकरच प्राप्त होईल, तसेच कर्मचारी भरतीचा आकृतिबंध अहवालास लवकरच मंजुरी मिळेल, असे मत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी व्यक्त केले.

महापालिकेच्या विषयांवर आयुक्त डॉ. गायकवाड यांनी मुंबईत मंत्रालयात उपसचिवांची भेट घेतली. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की सकारात्मक झालेल्या चर्चेत आकृतिबंधला तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, तर लेखापरीक्षण अहवालाबाबतदेखील या वेळी चर्चा झाली.(Municipal Corporation format of staff recruitment be approved soon Jalgaon News)

हेही वाचा: Special Ministry meeting : मुंबईत आदिवासी विकासमंत्र्यासोबत बैठकीत सकारात्मक चर्चा

अधिकाऱ्यांची केली मागणी

महापालिकेत कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचीदेखील कमतरता असून, जळगाव महापालिकेस अधिकारी देण्याची मागणी या वेळी आयुक्तांनी केली. यात एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, एक अतिरिक्त आयुक्त नियक्तीची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Railway Update : नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्या आजपासून