Latest Marathi News | नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्या आजपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Department

Railway Update : नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्या आजपासून

जळगाव : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागाने नागपूर ते मुंबई दोन एकेरी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वनवे स्पेशल ०१०७६ सुपरफास्ट स्पेशल १५ ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी दीडला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे चारला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोचेल.

दरम्यान, ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबेल.(Railway Update Nagpur to Mumbai one way special trains from today Jalgaon News)

हेही वाचा: BJP Agitation : तूप लोणीचोरी तरीही उलट्या बोंबा!

दुसरी गाडी नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस वनवे स्पेशल आहे. ही ०१०७८ सुपरफास्ट स्पेशल १८ ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी दीडला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.५० ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोचेल.

ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे येथे थांबेल.दोन्ही विशेष ट्रेनमध्ये दोन द्वितीय वातानुकूलित, आठ तृतीय वातानुकूलित, चार शयनयान, पाच सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

या गाड्या विशेष शुल्कासह बुकिंग शुक्रवार (ता. १४)पासून सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

हेही वाचा: Jalgaon : शहरात वाहतूक सिग्नल बंद वाहतुकीची कोंडी