27 नगरसेवक अपात्र करण्यासाठी तब्बल..तीस हजार पानांची भाजपने दाखल केली याचिका

27 नगरसेवक अपात्र करण्यासाठी तब्बल..तीस हजार पानांची भाजपने दाखल केली याचिका
Updated on: 

जळगाव :  जळगाव शहर महापालिकेत महापौर, उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेने सोबत गेले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे आज तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.


जळगाव महापालकेच्या महापौर, उपमहापौर पदासाचा कार्यकाळ संपली होती. तेरा दिवसापूर्वी झालेल्या ऑनलाईन निवडणूकीच्या पूर्वी भाजपचे २७ नगरसेवकांनी बंडखोरी करून शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर तर बंडखोरी केलेल्या गटातील कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले होते. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडून सत्ता असतांना भारतीय जनता पक्षाला नामुष्की पत्करावी लागली.

अपात्रतेचा दिला होता इशारा

भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानुसार  बंडखोर नगरसेवकांवर अपात्र ठरविण्यात कारवाई करावी यासाठी भाजपतर्फे आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची भाजपचे मनपा गटनेते भगत बालाणी यांनी दाखल केली आहे. 
 

पुरावे सोबत याचिका 
या बाबत पक्षाचे जळगाव महापालिकेतील गटनेते भगत बालाणी यांनी सांगितले, पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबत ही याचिका आहे. तब्बल तीस हजार पानांची याचिका असून या सोबत संपूर्ण पुरावे जोडण्यात आले आहेत. यात नगरसेवकांना घरी जाऊन बजावला गेलेला व्हिप, जाहीर व्हिप, नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान,असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मनपा इतिहासातील तीस हजार पानांची याचिका 
भारतीय जनता पक्षाने दाखल केलेली तीस हजार पानांची याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासात पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो या कडे राज्याचे लक्ष असणार आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com