Jalgaon Municipal Election : महापालिकेत सत्ताधारी, विरोधकांची मिलीभगत : अनिल चौधरी | Municipal Election Anil Chaudhary statement about opposition and Incumbent collusion in municipality jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil chaudhari

Jalgaon Municipal Election : महापालिकेत सत्ताधारी, विरोधकांची मिलीभगत : अनिल चौधरी

Jalgaon News : जळगाव महापालिकेत रस्ते, गटार तसेच इतर कामांत सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक आपसात मतैक्य करून निवीदा काढून कामे घेत असतात.

त्यामुळे कामे चांगली होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. (Municipal Election Anil Chaudhary statement about opposition and Incumbent collusion in municipality jalgaon news)

जनता महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांवरही नाराज आहे. त्यामुळे यावेळी जनता नवीन चेहऱ्यांना संधी देतील हे निश्‍चित आहे. प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही नवीन चेहऱ्यांना घेवून महापालिका निवडणूका लढणार आहोत, तसेच आगामी सर्व निवडणूकाही पक्षातर्फे लढण्यात येतील असे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनील छबीलदास चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना जाहीर केले.

येथील पदमालय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चौधरी म्हणाले, कि जळगाव महापालिकेत विकासकामासाठी शासनाकडून शंभर कोटींचा निधी आल्याचे सांगितले जाते. परंतु, त्या प्रमाणात या ठिकाणी विकासकामे दिसून येत नाहीत.

या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकाशी वाद करीत असले, तरी त्यांचे आतून ऐक्य आहे. विकासकामांच्या निवीदा एकत्र येवून घेतात. त्यामुळे काम चांगले होत नाही. परिणामी जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे जळगावच्या जनतेची विकास कामांबाबत ओरड आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

...अन्यथा स्वबळावर

आमदार बच्चु कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महापालिका निवडणूका लढविण्यात येतील. आम्ही ५० टक्के जागा पक्षातर्फे लढविणारच आहोत. भाजपशिवसेना (शिंदे गट) या मित्र पक्षांनी आम्हाला सन्मानाने चर्चा करून जागा दिल्या, तर आम्ही त्यांच्यासोबत लढू. अन्यथा आम्ही स्वबळावर लढण्यास समर्थ असल्याचेही चौधरी यांनी या वेळी सांगितले.

रावेर लोकसभा, दोन विधानसभा लढणार

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकही पक्षातर्फे लढण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, रावेर लोकसभा निवडणूक लढविण्यास आम्ही तयार आहोत. त्याशिवाय जिल्ह्यात रावेर विधानसभा व आणखी एक विधानसभा आम्ही शोधत आहोत.

दोन विधानसभा आम्ही लढणार आहोत. राज्यात पक्षातर्फे एकूण पंधरा विधानसभा लढण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष दिनेश कोळी, लगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख पराग कोचुरे, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शहर युवक अध्यक्ष सचिन हटकर उपस्थित होते.