Jalgaon Municipality News : महापालिका कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात मिळणार सातवा वेतन आयोग

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.
jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporationesakal

Jalgaon Municipality News : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सातवा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. एक हजार १६६ कर्मचाऱ्यांना डिसेंबर पेड ईन जानेवारीच्या वेतनात तो लागू होणार आहे.

तर पदोन्नती प्रस्तावासाठी प्रलंबित असलेल्या ३७८ कर्मचाऱ्यांचा प्रश्‍नही ३१ डिसेंबरपर्यंत मार्गी लावून त्यांनाही डिसेंबरच्या वेतनात सातवा वेतन देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.(Municipal employees will get seventh pay commission in December salary jalgaon news)

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर विशेष लेखापरीक्षण अहवालात आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू करण्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र नोव्हेंबर २०२३ मध्ये शासनाकडून वय अधिक असलेल्या, तसेच शैक्षणिक अर्हता नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही सामावून घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे आक्षेप असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या एक हजार १६६ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रश्‍न आता सुटला आहे. त्या कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू होणार आहे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

३७८ कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ

महापालिकेतील ३७८ कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्‍न होता. त्यांची पदोन्नती, तसेच इतर प्रश्‍न होते. त्याबाबत महापालिका आयुक्तस्तरावर निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. महापालिकेतील ३७८ कर्मचाऱ्यांपैकी २५८ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यापैकी २३ कर्मचारी मृत झालेले आहेत.

jalgaon municipal corporation
Jalgaon Municipality News : महापालिकेच्या युनिट कार्यालयाला कुलूप; कर्मचाऱ्यांना बजावली ‘शो-कॉज’ नोटीस

९७ कर्मचारी सेवेत असून, या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊन त्यांनाही डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

''महापालिकेतील एक हजार १६६ कर्मचाऱ्यांना डिसेंबरच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. उर्वरित ३७८ कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नाबाबतही ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय पूर्ण होऊन त्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.''- अविनाश गांगोडे, उपायुक्त, महापालिका जळगाव

jalgaon municipal corporation
Jalgaon Municipality News: महापालिकेत नवीन वर्षात कर्मचाऱ्यांची पदोन्नती; 1997 नंतर प्रथमच मिळणार नवीन पद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com