Jalgaon News : महापालिका करणार सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण; वैयक्तिक शौचालय अनुदान

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : महापालिकेतर्फे शहरात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी तब्बल आठ हजार लोकांना अनुदान देण्यात आले. तरीही काही भागांत सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी झालेली नाही.

त्यांच्या साफसफाईचा दरमहा खर्च वाढत आहे. त्यामुळे आता महापालिकेने या शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्‍यकता नसेल त्या ठिकाणचे शौचालय बंद करण्यात येणार आहेत. (Municipality to survey public toilets Individual toilet subsidy Jalgaon News)

केंद्र व राज्य सरकारने रस्त्यावरील शौचास बसणे बंद करण्यासाठी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १६ हजार रुपये अनुदान दिले आहे. जळगाव शहरात महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात आली.

त्यात शहरात आठ हजार ९३५ लोकांनी अर्ज केले होते. त्यापैकी आठ हजार लोकांना अनुदान देण्यात आले. त्यांचा वैयक्तिक शौचालये असल्याचा अहवाल महापालिकेला मिळाला आहे.

शहरात आठ हजार लोकांनी आपले वैयक्तिक शौचालय अनुदानावर बांधल्यामुळे सार्वजनिक शौचालयात जाण्याची तेवढी संख्या कमी झाली आहे. आजच्या स्थितीत शहरात महापालिकेच्या एक हजार ६५५ शौचालय सीट्‌स आहेत.

त्यांच्या साफसफाईसाठी दरमहा सात ते आठ लाख रुपये खर्च येत आहे. यातील काही शौचालयांचा वापर होत नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधले आहेत.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Jalgaon Municipal Corporation
Nashik Highway Accident:'चहा प्यायला थांबलो आणि...' त्या अपघातात ८ वर्षांच्या निधीने सर्वस्व गमावलं

मग सार्वजनिक शौचालयांत एवढ्या सीट्‌सची आवश्‍यकता नाही. या सीट्‌स कमी केल्या, तर महापालिकेचा दरमहा होणारा सफाई खर्चही वाचणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ४० नागरिकांमागे एक सीट्‌स, असे सार्वजनिक शौचालयाचे प्रमाण आहे.

त्यानुसार त्या भागातील शौचालयात दिवसभरात किती नागरिक येतात, याचे सर्वेक्षण करण्यात येतील. त्या प्रमाणानुसार त्या भागात तेवढ्याच सीट्‌स ठेवण्यात येतील. आवश्‍यकता नसेल त्या ठिकाणच्या सीट्‌स बंद करून तोडण्यात येणार आहेत. यामुळे महापालिकेच्या दरमहा सफाईचा खर्चही वाचणार आहे.

"वैयक्तिक शौचालयासाठी नागरिकांनी अनुदान घेतले आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचे सीट्‌स कमी होऊन दरमहा होणारा साफसफाईचा खर्च कमी होण्याची गरज आहे. त्याकरिताच हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे." -उदय पाटील, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग

Jalgaon Municipal Corporation
Nashik Crime News : मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री; 3 परप्रांतीय महिलांची सुटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com