जळगावात रंगणार राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Chess Tournament to be played in Jalgaon

जळगावात रंगणार राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस ॲकॕडमीतर्फे ८ ते १३ एप्रिलदरम्यान येथे राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे, अशा माहिती जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कांताई सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा संघटनेचे सहसचिव शकील देशपांडे, जैन स्पोर्टस ॲकॅडमी समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, अनिल जोशी आदी उपस्थित होते. गादिया यांनी सांगितले, की ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होणार आहे. भारतातील अग्रगण्य मोबाईल प्रीमियर लीग फाउंडेशन (एमपीएल) व स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) या संस्था अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाशी करारबद्ध असून, देशभरातील सर्व स्पर्धांसाठी त्यांचे सहकार्य असते. जळगावातील या बुद्धिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्‍यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारले आहे.

स्पर्धा सांघिक स्विस पद्धतीने खेळविली जाणार असून, स्‍पर्धेत भारतातील नावाजलेले दहा पुरुष व महिला ग्रँडमास्टर, १३ आंतरराष्ट्रीय मास्टर व फिडे मास्टर, राज्य संघटनेमार्फत चार अधिक एक राखीव अशा पद्धतीने स्पर्धेसाठी राज्याचे संघ आहेत. पुरुष गटामध्ये एलआयसी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्टस, सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड आरएसपीबी टीम, तमिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे, तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिशा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ, तर पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्डाचा संघदेखील स्पर्धेत सहभागी असेल.

दहा लाखांची बक्षिसे

स्‍पर्धेत तब्बल दहा लाखांची बक्षिसांची रक्कम विजेत्या संघांना प्राप्त होणार असून, पुरुष व महिला गटात समसमान अशी पाच लाखांची रोख बक्षिसे वितरित केली जातील. याव्यतिरिक्त स्पर्धेअंती प्रत्येक पटावरील सर्वांत जास्त गुण कमावणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

Web Title: National Chess Tournament To Be Played In Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..