NCB ची मोठी कारवाई, जळगावातून जप्त केला 1500 किलो गांजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganja

NCB ची मोठी कारवाई, जळगावातून जप्त केला 1500 किलो गांजा

क्रूझ ड्रग पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबी अर्थात नार्कोटीक्स कन्ट्रोल ब्युरो सध्या चर्चेत आहे. त्यातच आता एनसीबीने पून्हा एकदा राज्यात मोठी कारवाई केली असून, या कारवाईत थोडा थोडका नाही तर तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. जळगावजवळ केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आता एनसीबीने राज्यभरात कारवाईचा धडाका लावल्याचे दिसते आहे.

हेही वाचा: ST महामंडळाच्या विलीनीकरणाची मागणी अयोग्य - अजित पवार

मुंबई एनसीबीने मोठी कारवाई केली असून, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा विशाखापट्टणम येथून आणण्यात आला असून, या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे ड्रग्ज कुठे घेऊन जात होते याची माहिती एनसीबी घेत आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करांवर एनसीबीची करडी नजर असल्याचे दिसते आहे.

दरम्यान, अमली पदार्थ विरोधी मोहिमेने आता जोर धरला असून, मुंबई पोलिसांनी देखील तस्करांच्या मुस्क्या आवळाला सूरूवात केली आहे. मुंबई पोलिसांनी चार दिवसापूर्वी मोठी कारवाई करत एका तस्कराला व्यक्तीला ताब्यात घेतलं असून, त्याच्याकडून २.१४ किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले होते. या अंमली पदार्थाची किंमत जवळपास ६ कोटी रुपये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

loading image
go to top