निवडणूक निकालाआधीच 'या' जिल्ह्यात राष्ट्रवादीची बाजी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर I Gram Panchayat Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP VS BJP

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

Gram Panchayat Election : निवडणूक निकालाआधीच 'या' जिल्ह्यात राष्ट्रवादीची बाजी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon Gram Panchayat Election : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचं (Maharashtra Grampanchayat Election 2022) मतदान सुरू झालं आहे. राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे.

ग्रामपंचायतींच्या या निवडणुका राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर लढवल्या जात नसल्या, तरी या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

हेही वाचा: छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; शरद पवारांचा इशारा

यामध्ये बिनविरोध झालेल्या 18 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडं (NCP) गेल्या आहेत. तर, भाजपकडं (BJP) 5 तर शिंदे गटानं 3 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. उर्वरित 122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झालं आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह सरपंचांचीदेखील थेट जनतेतून निवड होणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी 20 डिसेंबरला पार पडणार आहे.

हेही वाचा: DY Chandrachud : जातीबाहेर लग्न केल्यामुळं दरवर्षी शेकडो मारले जातात; आंतरजातीय विवाहावर सरन्यायाधीशांचं मोठं भाष्य