आडगाव तरवाडे विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp logo

आडगाव तरवाडे विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा

पारोळा (जि. जळगाव) : आडगाव-तरवाडे (ता. पारोळा) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकतर्फी विजय प्राप्त करीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे.

या वेळी नूतन संचालकांचा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी पंचायत समिती सभापती रेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. या निवडणुकीत १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात राष्ट्रवादीने भरघोस मतांनी विजय प्राप्त केला. यात विजयी उमेदवार वाल्मिक पाटील, नगराज पाटील, कैलास पाटील, तापीराम चौधरी, संदीप पाटील, भगवान महाजन, भिका पाटील, वसंत राठोड, सुमनबाई माळी, मालूबाई पाटील, कोडजी पाटील, तुळशीराम तायडे, ज्ञानेश्वर चव्‍हाण या विजयी संचालकांचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अभिनंदन केले. दरम्यान, आडगाव -तरवाडे विविध कार्यकारी सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा: पोलिसांकडून शहरातील साडे तीन हजार सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

हेही वाचा: 'हो मी भावूक झालो, सरकार नसल्यामुळे जे सहन कराव लागलं... : चंद्रकांत पाटील

Web Title: Ncp Won On Adgaon Tarwade Vikas Society

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonNCP
go to top