
यंदा मात्र कोरोनामुळे हा आनंदोत्सव घरीच साजरा करावा लागणार आहे. कारण अकरानंतर सर्वत्र संचारबंदी असणार आहे.
जळगाव ः दरवर्षी ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून सर्वच जण मध्यरात्री बाराला साजरा करतात. मध्यरात्री सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदा मात्र नागरिकांना नववर्षाचा जल्लोष ‘कोरोना’मुळे साजरा करता येणार नाही. उद्या (ता.३१) रात्री अकरा ते पहाटे सहापर्यंत शहरासह जिल्हयात संचारबंदीची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे.
आवश्य वाचा- देवासारखे धावून आले डॉक्टर ; गरोदर महिलेला वेळेवर उपचार मिळाला म्हणून वाचले प्राण -
विशेषतः रात्री अकरानंतर संचारबंदीची पाहणीसाठी स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राउत, पाेलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे करणार आहेत.
३१ डिसेंबर म्हणजे सर्वच मद्दपींसाठी मद्दपानाची सुवर्णसंधी असते. ती संधी साधत रात्री उशिरापर्यंत मद्यपान, खानपान, संगीताच्या तालावर नृत्यांचा ठेका धरला जातो. त्यासाठी हॉटेल्सचे, लॉन्सचे बुकींग केले जाते. यंदा मात्र कोरोनामुळे हा आनंदोत्सव घरीच साजरा करावा लागणार आहे. कारण अकरानंतर सर्वत्र संचारबंदी असणार आहे. हॉटेल, ढाबे, रेस्टॉरेंट, बार, कॅफ यांनाही अकरापर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. नंतर मात्र पोलिस संचारबंदीच उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करून दंडही करणार आहे. यामुळे नागरिकांना उद्या रात्री अकराच्या आत घरात राहूनच सरत्या वर्षाला निरोप देवून नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.
आवर्जून वाचा- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय; दिवसभरात तब्बल ८० रुग्ण -
याबाबत शासनाच्या अनेक सूचना दिलेल्या आहेत.
हे करावे..
- घरातच नववर्षाचे स्वागत करावे
- सामाजिक अंतर पाळावे
- मंदिरात गर्दी टाळावी
- रात्री ८ वाजेपासून बंदोबस्त कडक
- रात्री अकराच्या आत घरात
हे करू नका...
* मिरवणुका काढू नये
* आतिषबाजी करू नये
* ध्वनीप्रदूषण करू नये
* धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम नको
संपादन- भूषण श्रीखंडे