
जिल्हयात सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जळगाव : सरत्यावर्षाला निरोपदेत नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईसह, हॉटेल, ढाबे विवीध व्यवसायीक संस्था सज्ज असतांना कोरोना पादृर्भावामुळे यंदा आनंदावर विरजण पडणार आहे. जिल्ह्यात रात्री ११ नंतरची कठोर संचार बंदी लागू झाली असून प्रत्येक रस्त्यावर तपासणी पथकांसह नाकाबंदी लावण्यात आली आहे. एकंदरीत रात्रभर दारु पिणाऱ्यांचे स्वप्न यंदा पुर्ण होणार नसून रस्त्यावर बाहरे पडताच पेालिसांचा दंडूका स्वागताला सज्ज राहणार आहे.
आवर्जून वाचा- सरत्या वर्षात केवळ एकनाथ खडसे विरुध्द भाजप; आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुराळा !
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे लग्न समारंभासह विवीध धार्मीक, सामाजीक कार्यक्रम रद्द झाले. आता थर्टीफर्स्टच्या कार्यक्रमावरही कोरोनाचे संकट ओढवले आहे. कोरोनाची खबरदारी घेत आनंद साजरा करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरवेळी पहाटेपर्यंत परवानगी असते. मात्र यंदा रात्री १०.३० पर्यंत वेळेची मर्यादा असल्याने तरुणाईसह हॉटेल व्यावसायिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दुसरीकडे कोरोना नियंत्रणासह अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून पूर्वसंध्येला कर्मचारी बंदोबस्तावर रवाना करण्यात आले आहे.
घरीच राहून साजरा करा थर्टी फर्स्ट साजरा करा
नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागतघरीच साधेपणाने साजरे करावे, ६० वर्षा वरील नागरीकांनी व १० वर्षा खालील मुलांनी सुरक्षीततेच्या व आरोग्याच्यादृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, धार्मीक, सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करु नये, नियमांचे पालन करत आनंदाने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी आवाहन केले आहे.
संचारबंदीमुळे हिरमोड
जिल्हयात सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे नववर्षाचे स्वागत दुसरीकडे संचारबंदी यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. दुसरीकडे निवडणुकांमुळे ग्रामीण भागांत हॉटेलवर चांगलीच गर्दी होणार असून प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.
आवश्य वाचा- लॉकडाउनच्या फटक्यात उद्योगांची फरफट; अनेकांचा कायमचा रोजगार गेला
जिल्ह्यातील बंदोबस्त असा
नाकाबंदी पॉईंट - ५८ ठिकाणे
फिक्स पॉईंट बंदोबस्त - १२६ ठिकाणी
गस्तीवरील पेट्रेालींग वाहने - ४५
डंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाई पथके - ३५
नियुक्त बंदोबस्तावरील अधीकारी कर्मचारी
पेालिस अधीकारी -९३
पेालिस कर्मचारी -६२७
होमगार्ड जवान -५७८
संपादन- भूषण श्रीखंडे