NMUच्या सशोधकांना 19 लाखांचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nmu

NMUच्या सशोधकांना 19 लाखांचा निधी

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेतील डॉ. सतीश पाटील व संशोधक डॉ.किरण मराठे- अजनाडकर यांना दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडून संशोधन प्रकल्पासाठी १९ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

डॉ.पाटील आणि डॉ.मराठे यांनी हा संशोधन प्रकल्प आयसीएमआरला सादर केला होता. विविध आजारांच्या उपचारामध्ये अत्यंत महत्वाचे असणारे प्रतिजैवके (ॲटिबायोटिक्स), जगभर विविध जिवाणू/विषाणूमुळे होणाऱ्या आजारावर सध्याची ‍प्रतिजैवके निष्प्रभ ठरत असल्याने या आजारांवर उपाय करणे कठीण जात आहे. जागतिक हवामानातील बदल, जंतूनाशकांचा अती वापर इ.कारणामुळे जिवाणूमध्ये प्रतिरोध तयार होत आहे, ही जागतिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यावर उपाय म्हणून नवीन अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्टनॉलॉजी) आणि नैसर्गिक घटकांचा वापर करुन प्रतिजैवण योग्य प्रमाणात दिल्यास ॲटिबायोटिक्स रेझिस्टन्स दिल्यास हा प्रश्न सूटुन असाध्य आजारावर उपचार होऊ शकतो असे संशोधन प्रकल्पात नमूद केले होते. या संशोधनाचे महत्व लक्षात घेऊन तीन वर्षासाठी या संशोधकांना हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

हेही वाचा: Cyber Crime : इन्स्टाग्रामवर तरुणीचे बनावट खाते तयार करून बदनामी

हेही वाचा: बांधकाम नकाशानुसार असल्यावरच पूर्णत्वाचा दाखला : विद्या गायकवाड

Web Title: Nmu Researchers Fund Rs 19 Lakh Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonnmuNMU Budget
go to top