अमळनेर : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही

हृदयविकाराचा धक्का बसलेल्या चालकाच्या पत्नीची आक्रमक भूमिका
अमळनेर  : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही
अमळनेर : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही sakal

अमळनेर : ‘माझ्या पतीची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही’, अशी भूमिका मंगळवारी हृदयविकाराचा धक्का बसलेल्या चालकाच्या पत्नीने घेतल्यामुळे आगारातून एकच बस रवाना झाली आणि त्या बसवरही परत येताना रत्नापिंप्री येथे दगडफेक झाली.

जळगाव- अमळनेर बसचे चालक प्रवीण पाटील यांना मंगळवारी (ता. ७) बस चालवितानाच हृदयविकाराचा झटका आला होता. पहिल्याच दिवशी सहा फेऱ्या सुरू केल्या होत्या. प्रवीण पाटील यांनी कशीतरी बस अमळनेर आगारात आणल्यानंतर ते खाली उतरताच जमिनीवर पडले होते. त्यांना प्रशासनाने दवाखान्यात नेण्यासाठी बस दिली नाही आणि तातडीची मदत केली नाही म्हणून कर्मचारी नाराज होते.

अमळनेर  : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही
नांदेड : एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप जोडणी

आजारी प्रवीण पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत, ‘माझे पती बरे होऊन घरी येत नाही, तोपर्यंत एकही बस बाहेर जाऊ देणार नाही’, अशी भूमिका घेत बसला आडव्या झाल्या. आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी कामगारांचा रोष नको म्हणून सर्व बस आगारात जमा केल्या. वरिष्ठांकडून बस सुरू करण्याचा आग्रह आणि आदेश, तर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोधामुळे भदाणे यांना मात्र त्रास सहन करावा लागला. त्यांनतर एकही बस गेली नाही. बसस्थानक परिसरात भाजपचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने हजर होते.

दरम्यान, सकाळीच अमळनेरहून बस (एमएच ४०, एन ९०८२) पारोळ्याकडे रवाना करण्यात आली होती. पावणेबाराच्या सुमारास बस परत येताना रत्नपिंप्री गावाबाहेर तपोवनजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने चालक रवींद्र सुरसिंग पाटील यांच्या हाताला दगड लागून जखम झाली. बसच्या काचा फुटल्या. त्यानंतर पारोळा पोलिसांना बोलाविण्यात आले. वाहक एस. एन. मोरे यांच्या सहकार्याने बस पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com