Nobel Science Talent Search Exam : राज्यातील 61 विद्यार्थ्यांची विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Nobel Science Talent Search Exam
Nobel Science Talent Search Examesakal

जळगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात यासाठी ,मागील वर्षी नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झालेली होती.

या परीक्षेच्या मुलाखती चा अंतिम निकाल काल (ता.१६) संध्याकाळी जाहीर करण्यात आला. याअंतर्गत राज्यभरातील शहरी तसेच ग्रामीण भागातील ६१ विद्यार्थ्यांची इस्रो स्पेस लॅब, आयआयटी, भारतीय प्लाजमा संशोधन संस्था सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.

नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रात गेल्या सहा वर्षांपासून भरीव कार्य सुरू आहे. (Nobel Science Talent Search Exam Selection of 61 students of state for science study tour jalgaon news)

राज्यभरातून सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ८१० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झालेली होती. त्यातून ६१ विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झालेली आहे.

यात पाचवी ते सातवी गटात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी शौर्य समीर गवस प्रथम तर इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात चाळीसगाव येथील तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी शुभम सतीश देशमुख प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच गट अ पाचवी ते सातवी मध्ये रत्नागिरी खेड येथील अलंकृता अविषकुमार सोनोने द्वितीय तर सात्त्विक दत्तात्रय भोकसे (पुणे) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. गट ब आठवी ते दहावी मध्ये ठाणे येथील न्यू हरिजन पब्लिक स्कूलचा मल्हार मनीष पाटील आणि भुसावळ येथील सेंट अलायसेस हायस्कूलचा विद्यार्थी मानस विलास पाटील द्वितीय व तृतीय आलेले आहेत.

या विद्यार्थ्यांना नोबेल फाउंडेशन'तर्फे इस्रो स्पेस लॅब ,अहमदाबाद, आयआयटी गांधीनगर आणि आयआयएम अहमदाबाद, भारतीय प्लाझ्मा संशोधन संस्था, सायन्स सिटी या सर्वोच्च शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे.

Nobel Science Talent Search Exam
Dhule News : कार्यकारी अभियंतापदी अखेर रवींद्र पाटील

एन एस टी एस परीक्षेचे हे पाचवे पर्व असून आजपर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामुळे भारतातील सर्वोच्च विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांना भेट दिली आहे .

यावर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा २८ मे २०२३ रोजी होणार असून अर्ज भरण्याची सुरवात www.nobelfoundation.co.in संकेतस्थळावर झालेली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी ओमकार करिअर ॲकॅडमी, दीपस्तंभ फाउंडेशन ,स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अमळनेर, महावीर क्लासेस जळगाव यांचे सहकार्य लाभले.

" ६१ विद्यार्थ्यांची विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी साठी निवड होणे ही एक वैज्ञानिक क्रांती आहे. खेड्या पाड्यातील मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान बाबत गोडी निर्माण होत आहे. नोबेल च्या कार्याला आता फळ मिळायला लागले आहे. या परीक्षेमुळे सर्वत्र विज्ञानमय वातावरण निर्माण होत आहे. डॉ एपीजे कलमांची स्वप्नं पूर्ण करणारी युवा पिढी यातून निर्माण होईल"

-जयदीप पाटील, संस्थापक, नोबेल फाउंडेशन.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Nobel Science Talent Search Exam
Nashik News: कापूस, सूतदर घसरल्याने यंत्रमाग उद्योगाला पुन्हा झळाळी; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

खालील विद्यार्थ्यांची झाली निवड

शौर्य गवस (रत्नागिरी),उन्नती पवार ( पुणे), शिवांश जाजू (यवतमाळ) यश पाटील (जळगाव) विहंग दुबळे (पुणे), अलंकृता सोनोने (रत्नागिरी), दिशा राणे (जळगाव),सुजय बानाईत (अमरावती )सुमेध भालेराव (रायगड) तन्मय लाडगे (कोल्हापूर) सर्वम भस्के (परभणी) आयुशी धर्माळे (अंजनगाव सुर्जी),

वेदांत तुरे (परभणी) अभिनव विटेकर (बीड) भाविका महाजन (जळगाव) मिहीर टंक (अमरावती) सोहम शिसोदे (जळगाव) सात्त्विक भोकसे (पुणे) प्रणव बाबा (जळगाव) आयुष मोरे (सातारा) मानस महाडेश्वर (कोल्हापूर) अनुजा कावरे (अमरावती) रुद्र अनिल महाडीक (सातारा) जानवी हाडोळे (अमरावती) हंस दोषी (माणगाव)मृणाल मोरे (कोल्हापूर)

भार्गव जाधव अनुष्का चौधरी (जळगाव)अमेय जाधव (सोलापूर) आर्यन कुलकर्णी (सांगली) शिवराज जवांजल (बुलडाणा)मानस पाटील (जळगाव) सुयोग अमृतकर (जळगाव )सोहम कोतकर

(कोल्हापूर) प्रद्युम्न कागवाडे (कोल्हापूर) पार्थ नरोटे (यवतमाळ) सम्यक कांबळे (यवतमाळ) सुबोध कांबळे (यवतमाळ) तुषार नायक (रायगड)आर्यन खंबायत (नाशिक) शुभम देशमुख (चाळीसगाव) ऋग्वेद सोनवणे (जळगाव) हर्ष राव (नाशिक)

आर्या पाटील (जालना) कृष्णा कापसे (नाशिक) प्रथमेश शिंदे (नांदेड) अद्वैत आढाव (अंजनगाव सुरजी)शंतनू देवकर (सातारा) सर्वज्ञ भाकरे (सोलापूर)मल्हार पाटील (ठाणे)दिनेश फल्ले (सोलापूर)तनिष्का लुकतुके (ठाणे) अमेय पै (मुंबई)

आर्यन माने (सातारा) वरद भोसले (पुणे) अविष कुमार पाटील (सातारा) सार्थक पाटील (रत्नागिरी) पियुष घुगरे (रत्नागिरी)राजवर्धन पाटील (सातारा) पूजा नागवेकर (मुंबई )आर्यन राऊत (गोंदिया)

Nobel Science Talent Search Exam
रेल्वे स्टेशनवर बॉम्ब अन् प्रवाशांची बोंबाबोंब! मनमाडला Mockdrill, तब्बल सव्वातास धुमश्चक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com