E-Crop Registration : मुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांना ई-पीक नोंदणीबाबत नोटीस; कारवाईचा इशारा

Notice to Chief Minister Revenue Minister regarding e crop registration jalgaon news
Notice to Chief Minister Revenue Minister regarding e crop registration jalgaon news

E-Crop Registration : ई-पीक नोंदणीबाबत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, त्यांचे मुख्य सचिव यांना भारत कृषक समाजाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर यांनी कायदेशिर नोटीस बजावली आहे.

ही नोटीस अॅड. चंद्रकांत फोकमारे यांच्या मार्फत पाठवून १ महिन्याच्या आत निर्णय न घेतल्यास कारवाई करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे. (Notice to Chief Minister Revenue Minister regarding e crop registration jalgaon news)

मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे ई- पिक नोंदणी मोहिम राबविली जात आहे. ती आपल्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून, फोटो काढुन माहिती भरावी यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

नोंदणी न केल्यास अमुक-अमुक योजनेपासून वंचीत राहाल, शेती पडीत असल्याचे दाखविण्यात येईल यासारखी भीती शेतकऱ्यांना दाखविण्यात येते.

Notice to Chief Minister Revenue Minister regarding e crop registration jalgaon news
Jalgaon Agriculture News : पाण्याशिवाय दोन महिने पिके तग धरणार! ब्राह्मणशेवग्याच्या शेतकरी पुत्राचे संशोधन

तरीसुद्धा शेतकऱ्यांकडून या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही.

कारण त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, पुरेसे ज्ञान नाही, आपल्याच कामात सतत व्यस्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे. तरीही शासनातर्फे वारंवार तारखा वाढवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. हे सगळे थांबवून ई-पिक नोंदणीची कामे पहिल्यासारखी शासनानेच करावी, असे नोटीशीत म्हटले आहे.

Notice to Chief Minister Revenue Minister regarding e crop registration jalgaon news
Cucumber Mosaic Virus : कुकुम्बर मोझॅक व्हायरस नियंत्रणासाठी समिती : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com