Jalgaon Crime News : इंदूरहून आणलेला नायलॉन मांजा पकडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nylon manja caught by municipal officials.

Jalgaon Crime News : इंदूरहून आणलेला नायलॉन मांजा पकडला

जळगाव : नायलॉन मांजा विक्रीस बंदी आहे. मात्र, आता चोरट्या मार्गानेही मांजा विक्रीसाठी आणला जात आहे. इंदूर येथून ट्रॅव्हल्सद्वारे जळगावात विक्रीसाठी आणलेला नायलॉन मांजा महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून दंडात्मक कारवाई केली. (Nylon manja brought from Indore caught Jalgaon Crime News)

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

हेही वाचा: SAKAL Impact | उपस्थिती भत्ता किमान प्रतिदिन 20 रुपये द्या: धनंजय मुंडेंचे शिक्षणमंत्री केसरकरांना पत्र

नायलॉन मांजा घातक असल्यामुळे न्यायालयाने त्याच्या वापरावर बंदी घातली आहे. तरीही त्याचा पतंग उडविण्यासाठी सर्रास वापर होत आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यात येतात. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी महापालिका सतर्क झाली आहे. त्यांनी हा मांजा पकडण्यासाठी शहरात व्यापक स्वरूपात मोहीम सुरू केली आहे.

बुधवारी (ता. ४) महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने इंदूर येथून ट्रॅव्हल्सद्वारे विक्रीसाठी आलेला मांजा पकडला. इंदूर येथून अंकल ट्रव्हल्समधून विजय काईटचे मालक आकाश राठोड यांचा नायलॉन मांजाचे पार्सल विक्रीसाठी येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

त्यावरून बुधवारी सकाळी त्यांनी संबंधित ट्रॅव्हल्स ऑफिसवर जाऊन तपासणी केली असता, तब्बल ८० रिल नायलॉन मांजा जप्त करण्यात आला व दुकानमालक आकाश राठोड यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र किरंगे, उल्हास इंगळे, रमेश कांबळे व दीपक भावसार यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: Nashik Crime News : झोपेत पत्नीची हत्त्या करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने ठोठावली जन्मठेप