Jalgaon : हेल्मेटधारी चोरट्यांनी वृद्धेची पोत लांबवली

chain snatching
chain snatchingesakal
Updated on: 

जळगाव : शहरातील गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (Gold Chain) तोडून चोरट्यांनी (Thieves) दुचाकीने पळ काढला. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (old lady chain snatching by Thieves in helmets Jalgaon Crime news)

chain snatching
वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड; कुंभारी ग्रामपंचायतीत ठराव मंजूर

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा हसमुख जाणी (वय ७०, रा. विष्णूनगर) कुटुंबीयांसह गणेश कॉलनीत वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. २) सकाळी ७ वाजेच्या सुमारास मंदिरातून घरी जाण्यासाठी शिवकॉलनी स्टॉपवर उतरल्या. गुरूदत्त कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळून घरी पायी जात असताना त्यांच्या मागून दोन अनोळखी दुचाकीस्वार आले. त्यांनी हेल्मेट घातलेले होते, तर मागे बसलेल्या एकाने शोभा जाणी यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत तोडून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली असता परिसरातील नागरिक जमा झाले. तोपर्यंत दोन्ही चोरटे पसार झाले होते. वृध्द महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

chain snatching
Jalgaon : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com