Jalgaon : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Jalgaon : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील बी. जे. मार्केट येथील सुपरवॉशिंग सेंटरवर काम करताना विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. शवविच्छेदन (Post Mortem) अहवाल आणि विद्युत निरीक्षकांच्या तपासणीत शॉक (Shock) लागल्याचे निष्पन्न झाल्याने शनिवारी (ता. २) या प्रकरणी जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Case filed in youths death case Jalgaon Crime news)

हेही वाचा: रावेरला शस्त्रक्रियागृह वर्षभरापासून बंद; कोट्यवधींची सामुग्री धूळखात

पिंप्राळा हुडको येथील रहिवासी शेख अफजल शेख अहमद (वय ४३) यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, त्यांचा मुलगा तौफिक हा शहरातील बी. जे. मार्केट परिसरातील सुपर वॉशिंग सेंटर येथे कामाला होता. नेहमी प्रमाणे २५ मार्चला तौफीक काम करत असताना त्याला विद्युत शॉक लागून तो बेशुद्ध पडला. तातडीने त्याला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्‍हापेठ पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. तौफिक याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर याप्रकरणी नुकताच विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्‍हापेठ पोलिसांनी संशयित वॉशिंगसेंटर चालक शेख साबीर शेख वहाब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड; कुंभारी ग्रामपंचायतीत ठराव मंजूर

Web Title: Case Filed In Youths Death Case Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..