Latest Marathi News | दही हंडीच्या दिवशीच दोघांनी घेतला जगाचा निरेाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death news

दही हंडीच्या दिवशीच दोघांनी घेतला जगाचा निरेाप

जळगाव : शहरातील सर्वोत्तमनगरात कलाभवन समोरील रहिवासी ३८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात दुपारी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तर, दुसऱ्या एका घटनेत हनुमाननगरातील ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेत जिवन यात्रा संपवली. संपूर्ण शहर दहीहंडीचा सण साजरा करत असताना शुक्रवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास दोन्ही घटना घडल्या असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कल्लूसिग प्रजापती कुशावह (वय ३८, रा. कलाभवन समोर, सर्वोत्तमनगर) हे मोठे भाऊ आणि वहिनीसोबत वास्तव्याला होते. पाणीपुरीची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी (ता. १९) दुपारी ४ वाजता कल्लूसिंग यांचा भाऊ हा पाणीपुरीची गाडी घेवून विक्रीसाठी निघून गेला. त्यावेळी कल्लूसिंग घरात एकटेच होते. राहत्या घरात त्यांनी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

हेही वाचा: Health Tips : रात्री सतत Washroom ला जाताय? करा ओव्याचे 'हे' उपाय

दुसरीकडे हनुमाननगरातील घटनेत दत्तात्रय दगडू चौधरी (वय ३१, रा. हनुमाननगर) यांनी घरासमोर सुरु असलेल्या निर्माणाधीन इमारतीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही मजूर जेवण करून साइटवर परतले असता, त्यावेळी त्यांना दत्तात्रय गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लागलीच ही घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दत्तात्रय यांना खाली उतरवीत जिल्हा रूग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषित केले. दोन्ही घटनांचा तपास सहाय्यक फौजदार सचिन मुंडे करत आहेत.

हेही वाचा: संताच्या विचारधारांमुळे महाराष्ट्राची धरती पवित्र - राष्ट्रपती कोविंद

Web Title: On Dahi Handi 2 Man Suicide In Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..