Health Tips : रात्री सतत Washroom ला जाताय? करा ओव्याचे 'हे' उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : रात्री सतत Washroom ला जाताय? करा ओव्याचे 'हे' उपाय

अनेकांना रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागते. हा त्रास वयोमानाने ज्येष्ठांमध्ये जास्त दिसत असला तरी हल्ली काही तरूणांनाही असा त्रास होतो. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यावर झोप न झाल्याने फ्रेश वाटत नाही. संपूर्ण दिवस थकल्यासारखा जातो. त्यामुळे काम करण्याची क्षमताही कमी होते. यावर आयुर्वेदात काही रामबाण उपाय सांगितले आहेत.

रात्री वारंवार लघवीला उठावे लागत असेल तर झोपण्यापूर्वी पाव चमचा ओवा व पाव चमचा तीळ मिक्स करून खावे. त्यामुळे रात्री सारखे उठावे लागणार नाही आणि झोपही पूर्ण होईल.

हेही वाचा: Health Tips : हे दोन पाँईंट दाबा आणि शुगर पूर्ण कंट्रोल करा

शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक साथीचे आजार होतात. या काळात सर्दी खोकल्याची साथ तर घरोघरी दिसते. डोक जड होणे, नाक चोंदणे, सतत शिंका येणे, खोकला याने माणूस हैराण होतो. यावर एक उत्तम औषध म्हणून आयुर्वेदात ओव्याचे महत्व सांगितले आहे.

सर्दी आणि त्यातील तक्रारींवर उपाय म्हणून भाजलेला ओवा थोडासा कुटून घ्यावा. सूती कापडात बांधून त्याची पूरचुंडी करावी. त्याचा वास घेतल्याने बरे वाटते. याबरोबरच जेवणानंतर पाव पाव चमचा ओवा खाणे व कायम गरम पाणी पिणे याचा फायदा होतो.

हेही वाचा: Health Tips : झोपेची सायकल बिघडलीये? रात्री 'या' गोष्टी खाणे टाळा

ओव्याचे फायदे

याशिवाय ओवा भूक न लागणे, पोटात जडपणा वाटणे, अपचनाने पोट दुखणे, छातीत कफ अडकला असेल तर, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर उपयुक्त ठरतो.

टॅग्स :TipsSleep health