Jalgaon News |भंगार बाजारावर आज हातोडा : आयुक्त डॉ. गायकवाड

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : शहरातील अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजार मंगळवारी (ता. ७) पोलिस बंदोबस्तात हटविण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकववाड यांनी दिली.

फुले मार्केटच्या अतिक्रमणधारकांना जागा देण्यात येणार आहे, तसेच शहरातील रस्त्यांचीही पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मॅट’च्या निर्णयानंतर शासनाने पदभार स्वीकारण्याचा आदेश दिल्यानंतर शनिवारी (ता. ४) सायंकाळी डॉ. विद्या गायकवाड यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. सोमवारी (ता. ६) त्यांनी कामास प्रारंभ केला. त्यांनी विविध निर्णय घेतले. (Commissioner Dr. Gaikwad say Hammer on scrap market today Alternative places will be given to hawkers in city Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Nashik News : नाशिककरांना अद्यापही मेट्रो निओची प्रतिक्षाच; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची फाइल हलेना

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले, की अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तही मंजूर केला आहे. त्यानुसार मंगळवारी बाजार हटविण्यात येईल.

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे ही कारवाई करण्यात येईल. त्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक, १५ पुरुष पोलिस शिपाई, पाच महिला पोलिस शिपाई, असा फौजफाटा उपस्थित राहणार आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे हा विभाग सक्षम करण्यासाठी महापालिकेने मक्तेदारामार्फत २० मजूर घेतले असून, यापुढे पाणीपुरवठा व बांधकाम विभागातही मक्तेदाराकडून मजूर घेतले जाणार आहेत.

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Jalgaon Municipal Corporation
Swachha Jal Abhiyan : स्वच्छ जल अभियानात नाशिक राज्यात अव्वल!

रस्त्यांची पाहणी करणार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ३८ कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे केली जात आहेत. महापालिकेकडून विविध भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांबाबत तक्रारी आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर कोटींगही केलेले नाही, त्याची पाहणी करणार आहे.

पर्यायी रस्त्याची पाहणी

असोदा पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद केले आहे. पर्यायी रस्त्याची पाहणी महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केली. याबाबत त्यांनी सांगितले, की असोदा रोडवर बसला वळण घेण्यात अडचणी झाल्यामुळे या रस्त्यांवरून जाणाऱ्या बस बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष असोदा रोडवर जाऊन पाहणी केली. बसला वळण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे लवकरच बस सुरू होणार आहेत.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : रस्त्यांवर कोटिंगचा लेअर टाका; महामार्ग विभाग मक्तेदारांना कळविणार

हॉकर्ससाठी जागा देण्यात येणार

शहरातील हॉकर्स समस्याबाबत त्यांनी सांगितले, की महापालिकेकडून शहरातील पथविक्रेत्यांचा सर्व्हे केला आहे. सर्व्हेनुसार शहरातील हॉकर्स झोन ठरविण्यात येणार आहेेत. नंतर शहरातील पथविक्रेत्यांना त्या-त्या हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय करावा लागणार आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

पवारांनी घेतली याचिका मागे

महापालिकेचे माजी आयुक्त देवीदास पवार यांनी ‘मॅट’ने डॉ. विद्या गायकवाड यांना पदनियुक्त करण्याच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यामुळे पुन्हा आयुक्तपदाचा प्रश्न ऐरणीवर येणार होता. मात्र, सोमवारी देवीदास पवार यांनी स्वत:हून याचिका मागे घेतल्याची माहिती मिळाली. यामुळे महापालिका आयुक्त नियुक्तीचा वाद आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे.

Jalgaon Municipal Corporation
Nashik Accident News : नाशिक हुन चाळीसगाव जाणाऱ्या बसला सांगवी फाटा येथे अपघात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com