Saptashrungi Devi Gad: दसऱ्यास शतचंडी यागास पूर्णाहुतीने सांगता; मोजक्याच मानकरींच्या उपस्थितीत बोकडबळी

Panchamrit Mahapuja and Aarti on Vijayadashami of Adishakti Saptashringimate.
Panchamrit Mahapuja and Aarti on Vijayadashami of Adishakti Saptashringimate.esakal

Saptashrungi Devi Gad : आदिमाया-आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची मंगळवारी (ता. २४) विजयादशमीस शतचंडी यागास पूर्णाहुती देऊन सांगता करीत दसरा उत्सव साजरा करण्यात आला.

दसरा टप्पा येथे न्यायालयाच्या निर्देश व बोकडबळी संदर्भात निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मोजक्याच प्रतिनिधी व मानकरींच्या उपस्थित बोकडबळी दिल्यानंतर पूर्णाहुती देण्यात आली.

सप्तशृंगगडावर आदिमायेच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तिध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयांतील सदस्यांनी कीर्तिध्वज फडकविल्यानंतर आज सकाळी कीर्तिध्वजाचे सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांनी ध्वजाचे दर्शन घेतले. (On Dussehra Shatchandi Yag are recited on saptashrungi devi gad nashik news)

दरम्यान, काल महानवमीनिमित्त देवी मंदिर सभामंडपात सायंकाळी सहाला शतचंडी यागाची सुरवात करण्यात आली होती. या वेळी पुरोहित संघाचे सर्व सदस्यांनी यज्ञविधित सहभाग घेत मंत्रघोषात व मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात यज्ञविधी झाला. सकाळी सप्तशृंगीदेवीच्या सुवर्ण अलंकारांची ट्रस्ट कार्यालयापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. पुरोहितांच्या मंत्रघोषात सातला देवीची महापूजा करण्यात आली.

नवरात्रोत्सवाच्या दशमीनिमित्त श्री सप्तशृंगीदेवीची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांनी सपत्नीक केली. दरवर्षीप्रमाणे अश्र्विन महानवमीस सप्तशृंगगडावर सायंकाळी सहाला शतचंडी याग व होमहवनास पुरोहितांच्या मंत्रोच्चरात प्रारंभ झाला. यागास आज सकाळी दहला ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व बोकडबळीचे मानकरी तुकाराम गांगुर्डे यांनी पूर्णाहुती देऊन दसऱ्याचा अद्‍भुत सोहळा पार पडला.

Panchamrit Mahapuja and Aarti on Vijayadashami of Adishakti Saptashringimate.
Kotamgaon Jagdamba Mata : 3 रूपांतील कोटमगावची जगदंबा माता

बोकडबळीच्या विधिवत पूजेसाठी सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायत प्रतिनिधी, विश्वस्त संस्था व परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलिस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूर्तता केली. या वेळी स्थानिक ग्रामस्थ, प्रतिनिधी, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, प्रशासनाचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळी गडावर घटी बसलेल्या स्थानिक महिला भाविकांनी कीर्तिध्वजाचे दर्शन घेऊन आदिमायेस नैवेद्य देऊन बसवलेले घट विसर्जित केले. दुपारी देवीस पुरणपोळी, वरण-भात, भाजी आदी पदार्थांचा नैवेद्य देऊन आरती संपन्न होऊन उत्साहाची सांगता करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील आलेल्या तब्बल २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. श्री सप्तशृंग निवासिनीदेवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Panchamrit Mahapuja and Aarti on Vijayadashami of Adishakti Saptashringimate.
Navratri 2023 : दसऱ्यादिवशी या किड्याचं दर्शन घडलं तर स्वत:ला नशिबवान समजा, का ते वाचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com