Jalgaon News : जळगावात रविवारी महामुर्ख संमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Mahamurkh Sammelan

Jalgaon News : जळगावात रविवारी महामुर्ख संमेलन

जळगाव : होळीनिमित्त (Holi) जळगावात वल्लभदास वालजी वाचनालयाच्या सभागृहात रविवारी (ता. ५) सायंकाळी सहाला साप्ताहिक सिटी न्यूजतर्फे महामुर्ख संमेलन होणार आहे.

यात हास्य कवी संमेलन, थापा मारण्याची स्पर्धा, व्यंगचित्र, विनोदी शेलापागोटे (फिशपॉंड) आदी कार्यक्रम होणार आहेत. (On Holi Mahamurkh Sammelan will be organized by Weekly City News on 5 march at Vallabhdas Valji Library Auditorium jalgaon news)

सर्वोत्कृष्ट थापा मारणाऱ्या स्पर्धकास रोख बक्षीस दिले जाईल. फुलस्केप कागदावर चांगले व्यंगचित्र काढून आणावे. यात कोणाचीही भावना दुखावणार नाही, याचे भान ठेवावे. चांगल्या व्यंगचित्रास बक्षीस देण्यात येईल, तसेच ही व्यंगचित्रे कार्यक्रमस्थळी लावण्यात येतील. या सर्व स्पर्धा नि:शुल्क व सर्वांसाठी खुल्या आहेत.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

अधिक माहितीसाठी विनोद त्रिपाठी, बोहरा गल्ली (९३७०००१०११), ॲड. जमील देशपांडे, आर.टी.ओ. कार्यालयाजवळ, बिपीनचंद्र नेवे, स्टेडियम संकुल, मॉं गायत्री ज्वेलर्स, सराफ बाजार, दीपक कासट, १८ नवी पेठ, संजय साखला, रथ चौक येथे संपर्क साधावा, तसेच कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित राहावे, असे अवाहन विनोद त्रिपाठी यांनी केले आहे.

टॅग्स :HoliJalgaonEventComedy