Jalgaon NMU G 20 Summit : युवाशक्ती ‘पंचप्रण’ पूर्तीसाठी विद्यापीठात जी २० युवा संसद @ २०४७ संमेलन

rajesh pande
rajesh pandeesakal

भारतात योजण्यात आलेल्या जी २० शिखर परिषदेच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने शुक्रवारी (ता. २१) जी २० युवा संसद @ २०४७ या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाचे बीजभाषण राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे करणार आहेत.

घडवू आमच्या कर्तृत्वाने भारतभूचे रूप नवे युवक व क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित जी २० युवा संवाद भारत @ २०४७ च्या संमेलनासाठी उपस्थित सर्व मान्यवर प्राध्यापक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मित्रांनो! (On occasion of G20 Summit in KBCNMU organized conference called G20 Youth Parliament 2047 on 21st jalgaon news)

अरे मानसा मानसा कधी होशील माणूस? लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस या शब्दांमध्ये मनुष्याला त्याच्या मनुष्यत्वाची जाणीव करून देणाऱ्या महान प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या खानदेशच्या भूमीत आज आपण भारतभूचे नवे रूप आपल्या कर्तुत्वाने घडविण्याचा संकल्प करण्यासाठी एकत्र झालेले आहोत.

मी आपल्या सर्वांच्या महत्त्वकांक्षेचे आणि दुर्दम्य आशावादाचे मनःपूर्वक स्वागत करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे पंचप्रण आपल्यासमोर मांडले, त्या पंचप्रणांना आपण यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेले आहोत. ९ ऑगस्ट, १५ ऑगस्ट या काळात आपण महाराष्ट्रातील अडीच हजार महाविद्यालयांमधून दोन लाख स्वयंसेवकांच्या मदतीने ४० लाख युवक- युवतींशी संवाद साधणार आहोत.

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांच्या स्थानिक प्रश्नांच्या गरजेनुसार विविध विषय घेऊन त्या विषयांच्या अनुषंगाने जिल्ह्यांचा विकासाचा आणि प्रगतीचा विचार पुढे नेणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचप्रणांचा विचार घेऊन भारताचा विकासाचा संकल्प करणार आहोत. आजचे हे संमेलन याच प्रयत्नांचा एक भाग आहे.

मला या ठिकाणी गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या विचारांची आठवण होत आहे. तरुणाईची व्याख्या करताना त्यांनी सांगितले, की तारुण्याचे तीन ‘त’ कार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rajesh pande
Jalgaon News : ..अन् इथे ओशाळली माणुसकी! पोटच्या गोळ्याला विकणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती...

पहिला म्हणजे तेजस्विता, दुसरा म्हणजे तपस्विता आणि तिसरा म्हणजे तत्परता. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक या तीन प्रकारांचे मूर्त रूप आहे, असे मला वाटते.

या पंचप्रणांचा विचार करताना पहिले पंचप्रण म्हणजे विकसित भारत होय. महात्मा गांधी ते भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम या महान विचारवंतांच्या विचारांतील आणि स्वप्नातील आधुनिक भारत आपल्याला निर्माण करायचा आहे. भारत जागतिक महासत्ता झाली पाहिजे, असे आवाहन माननीय कलामसाहेबांनी केले होते.

त्यामुळे या G-20 च्या निमित्ताने जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून भारताला पुढे आणण्याचा नरेंद्र मोदीसाहेबांचा प्रयत्न आणि त्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञानात घेतलेली गगनभरारी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात.

नुकतेच आपण तिसरे चंद्रयान उड्डाण यशस्वी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना, प्रधान मंत्री मुद्रा योजना, स्टार्टप इंडिया, डीजिटल इंडिया, बेटी बचाओ-बेटी पढाओ, तसेच सुकन्या समृद्धी योजना अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांच्या प्रयत्नांतून आज कार्यरत आहे.

दुसरा पंचप्रण म्हणजे गुलामगिरीच्या मानसिकतेतून शतप्रतिशत मुक्तीचा संकल्प : मित्रांनो, भारत आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. अशावेळी आपल्या मनाच्या कोणत्याही कोपऱ्यात गुलामगिरीचा एकही अंश राहू देता कामा नये.

rajesh pande
NMU MSW Entrance Exam : ‘एमएसडब्ल्यू’ प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल; आता 30 ऐवजी या तारखेला

प्रत्येकाला आपल्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी वाव मिळणार, हा प्रचंड मोठा सकारात्मक विचार या पंचप्रणातून उद्यापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे. भारतीय राष्ट्रवादाची संकल्पना आपल्याला रुजवायची आहे. मानवी मूल्य आणि त्याचबरोबर विविध कौशल्यांना वाव, हे या धोरणाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिक्षणातून माणूस घडला पाहिजे, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे.

तिसरे पंचप्रण म्हणजे भारतीय वारशाचा अभिमान भारताचा इतिहास हा त्यागाचा आणि समर्पणाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजे, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज इत्यादी ऋषितुल्य महाराजांनी आणि महाराणी यांनी प्रचंड त्याग या देशासाठी केला आहे.

तक्षशिला आणि नालंदासारख्या विद्यापीठांनी आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीने भारताची ज्ञानपरंपरा संपन्न आहे. भारतातील ऋषी परंपरा आणि त्यातून जे विज्ञान पुढे आले त्या सर्वांचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. भारतातील स्थापत्यशास्त्रातील मंदिर आणि लेण्या ही जागतिक पातळीवर अभिमानाची बाब आहे.

शिवबा राजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याची ३५० वर्ष पूर्ती लक्षात घेता या पार्श्वभूमीवर हे पंचप्रण महत्त्वाचे ठरते. कारण हा महान जाणता राजा आमचे दैवत आहे. अजिंठा- वेरूळसारख्या लेण्या, मंदिरे, गड-कोट किल्ले भारतीय संस्कृतीची प्रसादचिन्हे आहेत.

rajesh pande
Jalgaon NMU News : ‘उमवि’ संलग्न 24 महाविद्यालयांना ‘नो ॲडमिशन’चा दणका; नॅक मूल्यांकन टाळणे महागात

चौथे पंचप्रण म्हणजे एकात्मतेचे सामर्थ्य. भारत आज जगाच्या पाठीवर विविध धर्म, भाषा, परंपरा, विचार यांनी संपन्न असतानाही एकसंघ म्हणून अभिमानाने आणि आत्मविश्वासाने उभा आहे. याचे कारण म्हणजे आपल्या देशाचा पाया भारतातील संत आणि विचारवंतांच्या विचारांवर उभा आहे.

मानवता हाच खरा धर्म आहे, हा विचार आपल्या देशाच्या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आणि वारी ही आमची अस्मिता आहे. यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आषाढी एकादशीनिमित्ताने हरित वारीची संकल्पना आम्ही पुढे आणली आणि विक्रमी अशी यशस्वी केली.

पाचवे पंचप्राण म्हणजे नागरिकांची कर्तव्ये. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणून तुकोबारायांनी पर्यावरणाची साद घातली आहे. आज पर्यावरण वाचले तरच मनुष्य वाचेल. त्यामुळे पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन हे मोठे आवाहन आपल्यासमोर आहे.

rajesh pande
Jalgaon NMU News : बहिणाबाई चौधरी, साने गुरुजींच्या नावाने शिष्यवृत्ती; संशोधनास मिळणार प्रोत्साहन

त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या संदर्भात आपण जागरूक राहणे आणि संविधानाचे पालन करणे, हेदेखील आपले कर्तव्य आहे. निवडणुकीच्या काळात मतदान करणे आणि इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करणे, ही फार महत्त्वाची बाब आहे.

पुरुषा इतकेच स्त्रीचे सामर्थ्यदेखील स्वीकारणे, ही आजच्या काळाची गरज आहे. या पंचप्रणांना विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अंमलात आणणे आणि इतरांनाही यासाठी प्रवृत्त करणे, हाच या संमेलनाचा हेतू आहे. पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत म्हणजे अमळनेरला माझी जडणघडण झाली.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो हा साने गुरुजींचा काव्यविचार, जीवनविचार आज मला या गिरणेच्या काठी मोठ्या डौलाने उभ्या असणाऱ्या विद्यापीठाच्या भूमीत आठवत आहे. बहिणाबाई ते साने गुरुजी ही विचारांची शलाका घेऊन आपण संवाद साधू या आणि हे पंचप्रण यशस्वी करू या. हा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो, जय हिंद जय भारत!

(लेखक राजेश पांडे, राज्य सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना व सल्लागार समिती सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.)

rajesh pande
Jalgaon NMU News : ‘युवा संवाद @ २०४७’मध्ये होणार मंथन; ‘उमवि’त आज चर्चासत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com