Latest Marathi News | दुचाकी अपघातात मुमराबादचा एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon News : दुचाकी अपघातात मुमराबादचा एक ठार

जळगाव : भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत देविदास दशरथ पाटील (वय ५६, रा. ममुराबाद, ता. जळगाव) जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी (ता. १६) रात्री साडेअकराच्या सुमारास ममुराबाद रोडवरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ घडली.

ममुराबाद येथे देविदास पाटील आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून, ते दाणा बाजारात हातमजुरी करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास देविदास पाटील त्यांच्या दुचाकी (एमएच १९, डीजे ३६०९) वरून ममुराबादकडे जात होते. (One killed in a two wheeler accident from Mukramabad Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

हेही वाचा: Jalgaon Crime News : गावठी पिस्तूल विक्रेत्यांना अटक

तर मयूर डांगे व त्याचा मित्र ऋषी महाले दुचाकी (एमएच १९, डीएक्स ४१११)वरून ममुराबाद येथून हळीदाचा कार्यक्रम आटोपून जळगावडे भरधाव वेगाने येत होते. याचवेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दुचाकीवरील देविदास पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर धडक देणारे मयूर डिगंबर डांगे (वय २३) व ऋषी आबा महाले (वय २१, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दुचाकीस्वार दोन्ही तरुणांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विलास शिंदे तपास करीत आहे.

हेही वाचा: Jalgaon News : मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती