Online Fraud : IPS असल्याचे सांगत प्रौढास गंडविले; अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Fraud

Online Fraud : IPS असल्याचे सांगत प्रौढास गंडविले; अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

जळगाव : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रौढास पाच लाख ८१ हजारांचा ऑनलाईन गंडा (Fraud) घातला. याबाबत सायबर क्राइम शाखेत गुन्हा दाखल झाला आहे. (online fraud to an adult by pretending to be an IPS officer threatening to spread obscene video viral jalgaon crime news)

शहरातील ५३ वर्षीय व्यक्ती खासगी नोकरीद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गेल्या आठवड्यात ४ फेब्रुवारीस त्यांना व्हॉट्सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यात त्याने व्हिडिओ कॉल करून अश्लिल व्हिडीओ पाठविले.

त्यानंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर ते व्हिडिओ युट्यूबवर टाकून व्हायरल करण्याची धमकी देत प्रौढ व्यक्तीकडून पैशांची वारंवार मागणी केली. त्यामुळे प्राैढ व्यक्तीने आतापर्यंत पाच लाख ८१ हजार रुपये विविध बँकेच्या खात्यात जमा केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुन्हा परत दुसऱ्या क्रमांकावरून आयपीएस अधिकारी ओमप्रकाश व मंजित सिंग असल्याचे नाव सांगून पुन्हा पैशांची मागणी या प्रौढ व्यक्तीला होऊ लागली.

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रौढ व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी सातला अनोळखी दोन मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.