Jalgaon News : अज्ञात वन्यप्राण्यांमुळे कजगावात घबराट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wild Animal Caught in Camera

Jalgaon News : अज्ञात वन्यप्राण्यांमुळे कजगावात घबराट!

कजगाव (जि. जळगाव) : येथील सावता माळी चौक परिसरात अज्ञात वन्यप्राण्यांच्या प्रवेशाने चांगलीच धडकी भरली आहे. (Panic in Kajgaon due to unknown wild animal Jalgaon News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik Crime News : बहाणा करीत लुबाडलेली भांडी मालेगावमधून हस्तगत; संशयित फरार

हा प्राणी कोणी उदमांजर तर कोणी रानमांजर तर कोणी भलतंच काही सांगत आहे, अशी वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे. मात्र नेमका हा प्राणी कोणता, यावर अजूनही स्पष्ट झाले नाही. हा प्राणी रात्री अपरात्री जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

त्यामुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे वन विभागाने या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन या विषयी असलेली ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करावी व या अज्ञात प्राण्यांचा शोध घेऊन त्याला त्वरित पकडावे, अशी मागणी जोरदार होत आहे. या बाबत वन विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा: Jindal Fire Accident: दुर्घटनाग्रस्त जिंदाल कंपनीची कामगारमंत्री सुरेश खाडेंकडून पाहणी; पाहा Photos

टॅग्स :JalgaonDangerWild Animals