Jalgaon Crime News : रिक्षात प्रवाशी बसवुन चाकु लावून करत होते लूट; दोन संशयितांना अटक

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : रिक्षात बसलेल्या प्रवाशाला चाकू लावून मोबाईल आणि एक हजार रुपये लुटल्याच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना कुसुंबा येथून अटक केली आहे.

जळगाव रेल्वेस्थानकावरून एमआयडीसीत रिक्षातून येत असताना, प्रवासी जितेंद्रसिंग रामकिशन मौर्या याला रिक्षाचालकासह एकाने चाकू लावून त्याच्याकडील मोबाईल व एक हजाराची रोकड बळजबरीने हिसकवली होती.(Passengers in rickshaw robbed at knifepoint Two suspects arrested jalgaon crime news)

याबाबत एमआयडीसी पोलिसांत १९ जूनला गुन्हा दाखल झाला होता. उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, साईनाथ मुंढे यांनी कुसुंबा येथून आयुष सुवर्णसिंग तोमर (वय २१) व त्याचा साथीदार पवन निवृत्ती लोहार (वय २४) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघांनी गुन्हा कबूल केला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Jalgaon Crime News : चाळीसगावचा सराईतत गुन्हेगार दत्तात्रय चौधरी शहरातून हद्दपार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com