जळगाव : मेंदूच्या डॉक्टराअभावी रुग्णाचा मृत्यू

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू नातेवाइकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली
 Patient dies due to lack of brain doctor Relatives allege negligence
Patient dies due to lack of brain doctor Relatives allege negligencesakal

जळगाव : जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णास वेळीच मेंदूचे डॉक्टर उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अवचित काळू तायडे (वय ४६, रा. समतानगर) पक्षाघाताच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते. त्यांचा सोमवारी (ता. ४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अवचित काळे हातमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पक्षाघाताचा सारखा त्रास जाणवत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी दिवसभर केवळ सलाइन लावून ठेवले तर रात्री ऑक्सिजन लावला. डॉक्टरांनी पाहिजे ते उपचार योग्यवेळी न दिल्याने तसेच ऑक्सिजनची नळी मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचे दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडिओसुद्धा नातेवाइकांकडे आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक हॉस्पिटलमध्ये मेंदूचे तज्ज्ञ नसल्याचे उत्तर नातेवाइकांना दिले तसेच त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागेल असे सांगितले. याच गडबडीत अवचित काळे यांचा मृत्यू ओढवला.

पोलिसांत देणार तक्रार

डॉक्टरांनी दिवसभर कुठलेही उपचार केले नाही तसेच लक्षही दिले नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही अवचित यांच्या नातेवाइकांनी केली असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी एकच गर्दी केली होती.

डॉक्टरांवर कारवाईची मागणी

ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही या वेळी महानगराध्यक्ष अडकमोल यांनी दिला आहे. मयत अवचित काळे यांच्या पश्चात पत्नी शारदा, मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com