Jalgaon : 42 कोटींच्या रस्त्यांचा खेळ; खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त

roads in bad condition
roads in bad conditionesakal

जळगाव : निधी उपलब्ध आहे, मक्तेदाराने मक्ता घेतला आहे, कामाचे आदेशही दिले आहे, पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन कामाची हमीही घेतली आहे. परंतु अद्यापपर्यंत काम सुरूच झाले नाही. जळगाव शहरातील ४२ कोटीच्या रस्त्याच्या कामाची ही आहे कथा! दुसरीकडे रस्त्यातील खड्ड्यांमुळे जळगावकर नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. रस्त्याची कामे (Road Construction) सुरू करण्याच्या शुभारंभाचा तिढा सोडविणार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. (pending work of 42 crore rupees road public suffered due to potholes Jalgaon News)

जळगाव शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे, शहरातील रस्ते चालण्यासाठीही चांगली नाहीत, या रस्त्यांच्या कामासाठी जळगाव महापालिकेकडे निधी उपलब्ध नव्हता, मात्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाकडून ४२ कोटी रुपयांचा निधी रस्त्याच्या कामासाठी दिला आहे. त्यातून जळगाव शहरातील रस्त्याची कामे होणार आहे. मात्र ही कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. कामाचा निधी महापालिकेकडे येणार आहे, तर काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाचे आहे. यासाठी निविदा काढून मक्तेदारही नियुक्त करण्यात आला आहे.

मात्र या कामात काही रस्ते नवीन टाकले आहेत, सद्या साहित्याचे भाव वाढल्याने आपणास भाववाढीचा फरक देण्यात यावा, अशी मागणी मक्तेदाराने करीत काम करण्यास नकार दिला होता. शासनाच्या बांधकाम विभागाने भाववाढीची मागणी महापालिकेकडे केली, मात्र महापालिकेने नकार दिल्याने कामाचा तिढा निर्माण झाला. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करून भाववाढीच्या रकमेबाबत शासनाकडून निधी आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असे सांगून मक्तेदाराला काम करा किंवा काम सोडा असे आदेश दिले. यानंतर काम सुरू होईल अशी अपेक्षा होती.

मात्र तिढा अद्यापही कायम

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मध्यस्थीनंतर या कामाचा तिढा सुटलाच नाही. त्यामुळे अद्यापही काम सुरू झालेले नाही. मक्तेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्यात अद्यापही वाद सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की महापालिकेला आम्ही ज्या रस्त्याची कामे करणार आहोत, त्याबाबतचे सविस्तर पत्र दिले आहे, मात्र त्यावर मंजुरी होउन ते पत्र आमच्याकडे आलेच नाही, शिवाय पाच कोटी रुपयेही अद्याप मिळालेले नाहीत, त्यामुळे काम सुरू कसे होणार?

महापालिकेचे अधिकारी म्हणतात, पाच कोटीचा धनादेश आम्ही पाठविला आहे, तो त्यांना मिळेलच त्यामुळे त्यांनी काम सुरू करावयास काय हरकत आहे? तर मक्तेदाराचे भाववाढीच्या फरकाची रक्कम मिळण्याचे पालुपद कायम आहे. त्यामुळे सद्या तरी कोणाचा कोणाला ताळमेळ लागल्याचे दिसत नाही. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही प्रश्‍न सुटत नसल्यामुळे आता रस्त्याचे काम सुरू कसे होणार, हाच प्रश्‍न निर्माण होणार आहे.

roads in bad condition
40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम

जळगावकर मात्र त्रस्त

रस्त्याचे काम सुरू करण्याचा वाद सुरू आहे, मात्र दुसरीकडे रस्त्यातील खड्यांमुळे जळगावकर त्रस्त आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाले नाही तर पावसाळ्यात याच खड्ड्यात पाणी साचून अपघाताचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे हा तिढा सोडवून रस्त्याचे काम तातडीने करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

roads in bad condition
नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

"आम्ही महापालिकेला काम करण्याच्या रस्त्यांची यादी पाठविली आहे, मात्र त्यांनी अद्याप त्याला मंजुरीची स्वाक्षरीच केलेली नाही. शिवाय पाच कोटी रुपयांचे अंशदान अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे काम सुरू कसे करणार?" - प्रशांतकुमार येळई

"महापालिकेने रस्त्याच्या मंजुरीचे पत्र अगोदरच दिले आहे. कोणते रस्ते करावयाचे याची यादी दिली आहे. जि. प. ते नेरीनाका स्मशानभूमी, दूध फेडरेशन ते शिवाजीनगर पूल, गणेश कॉलनी ते कोर्ट, काव्य रत्नावली चौक ते वाघनगर हे चार रस्ते प्राधान्याने करावयाचे आहेत. महापालिकेचे सर्व काम क्लीअर झाले आहे. पुढीन काम त्यांनी सुरू करावयाचे आहे."

- विलास सोनवणी, शहर अभियंता, महापालिका, जळगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com