Jalgaon Crime News : मुलीची छेड काढून चॉपरने धमकावले

crime
crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील नवीन बसस्थानकातून निघालेली बस थेट तालुका पोलीस ठाण्यात पोचली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची तक्रार केल्याने चालकाने बस पोलीस ठाण्यात आणली.

पण त्या तरुणाने चालत्या बसमधून उडी घेत पळ काढल्याची घटना गुरुवारी (ता. २) दुपारी घडली. ()

जळगाव-नांदगाव या बसमध्ये (एम.एच. ८० वाय ५१९३) विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रवाश्यांची गर्दी होती. बस आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यावर एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढली.

विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो त्याच्या मित्रांसोबत बसमध्ये गोंधळ घालून विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करत होता.

crime
Jalgaon Crime news : तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

त्यानंतर विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने वाहकांनी चालक तुकाराम रायसिंग यांना बस तालुका पोलीस ठाण्यात नेण्याची सूचना केली. नांद्रा गाव एक किलोमीटरवर असताना चालकाने बस गावात न नेता जळगावकडे फिरवली. पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या टवाळखोरांनी बस थांबवण्याची विनंती केली.

चालकाने बस पोलिस ठाण्याकडे नेली. बस थांबत नाही म्हटल्यावर तरुणाने पोलिसांना नाव सांगणाऱ्यांना चॉपर दाखवून धमकी दिली. आव्हाणे फाट्याजवळ तरुणाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारली. इथून तो पसार झाला. विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime
Jalgaon Crime News : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com