Jalgaon : ‘५४ रुपयांत पेट्रोल’ विक्रीचा स्टंट गेला फेल!

Petrol for Rs 54 sale stunt
Petrol for Rs 54 sale stuntesakal

जळगाव : मनसेने मंगळवारी (ता. १४) राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त (Raj thackeray birthday) ५४ रुपयांत एक लिटर पेट्रोलचा (Petrol) उपक्रम राबविला खरा.. मात्र, ऐनवेळी गर्दी वाढून नियोजन कोलमडल्याने हा उपक्रम आवरता घ्यावा लागला. विविध लक्षवेधी आंदोलनासाठी जळगाव मनसे (MNS) पदाधिकारी नेहमीच चर्चेत असतात. मंगळवारीदेखील अशाच आंदोलनाची चर्चा दिवसभर रंगत होती. (Petrol for Rs 54 sale stunt on Raj Thackeray Birthday Jalgaon News)

उपक्रमाचा स्टंट

यंदा मात्र, आंदोलन बाजूला ठेवत त्यांनी उपक्रमाचा निर्णय घेतला. तोदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवशी... मंगळवारी जळगावकरांना ५४ लिटर दराने पेट्रोल वाटप करण्याचे ठरले. पेट्रोलपंपही ठरला. मनसेच्या इंजिनच्या मफलरला गळ्यात गुंडाळत गाठ मारुन कायकर्ते सागरपार्कसमोरील पंपावर धडकले. एक दोन कॅमेरामन, माध्यम प्रतिनिधीही आले.. ठीक ११ वाजता एका मागून एक ५-६ च्या गटाने दुचाकीच्या रांगा लागल्या.. अन्‌ वाटप सुरु झाली..

अन्‌ गर्दी वाढली

हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले अन्‌ दहा मिनिटांच्या आत शंभरावर वाहने या पंपावर धडकलीत. काही वाहनांमध्ये ५४ रुपये दराने पेट्रोल भरल्यावर स्वस्त पेट्रोलच्या अपेक्षेतून रांगेत उभे असलेल्या वाहन धारकांच्या टाकीपर्यंत पेट्रोलचा पाईप येण्यापूर्वीच वाटप थांबलं..

Petrol for Rs 54 sale stunt
नाशिक : शहर तलाठ्याला लाच घेताना अटक

काहींचं बिनसलं!

रांगेत थांबूनही आपल्याला का स्वस्त पेट्रोल देत नाही? म्हणून पंपावरील कर्मचाऱ्यास एका ग्राहकाने चौकशी केली.. त्याने मफ्लरधारी कार्यकर्त्यांकडे बोट केल्यावर त्याला विचारणा झाली. त्याने ‘वेळ संपली’, असे सांगताच रांगेतून बडबड सुरु झाली. एका ज्येष्ठ नागरिकाने उपक्रमाचे कौतुक करुन त्या एकाच्या वादाकडे दुर्लक्ष करा पण, सामान्यांना तर द्या असा आग्रह केला.. काहींनी तर ठराविक कार्यकर्त्यांनीच ‘५४ रुपये लिटर’चा लाभ घेतल्याचा आरोपही करुन टाकला.

Petrol for Rs 54 sale stunt
मालेगावात जोरदार पावसाची हजेरी; वीजपुरवठा खंडित

"वेगळा उपक्रम म्हणून आम्ही प्रयत्न केला. ७८ जणांना रितसर ५४ रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल भरुनही दिले. मात्र, नंतर गर्दी वाढली, वाहनधारकांनी शिस्त पाळली नाही. म्हणून हा उपक्रम आटोपता घ्यावा लागला."

- जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष, मनसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com